महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळाभाऊ घोटकुले यांनी मावळ केसरी 2023-24 कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत शिवली गावच्या विपुल आडकरने मावळ केसरीचा किताब पटकाविला. तर, तळेगावचा समर्थ गोवेकर कुमार केसरी आणि सोमाटणेची सनम शेखने महिला केसरीची मानकरी ठरली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनेव नामदार बाळासाहेब भेगडे स्नेह ग्रुप आणि पै. बाळासाहेब घोटकुले युवा मंचच्या वतीने संजय उर्फ बाळासाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या भव्य मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवली गावचा राष्ट्रीय खेळाडू विपुल नारायण आडकर याने मळवंडी ठुले गावच्या दिनेश ज्ञानेश्वर ठुले याचा पराभव करून मानाचा मावळ केसरी कुस्ती किताब पटकावला आहे. यावेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी हेही उपस्थित होते. ( Maval Kusti Kesari Tournament 2023 )
या स्पर्धेचे उद्घाटन माजी ऑलिंपिकवीर कुस्तीगीर मारुती आडकर, विद्यापीठ चॅम्पियन चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांच्या हस्ते झाले. तर पारितोषिक वितरण माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी, काका पवार, अमोल बुचडे आदींच्या हस्ते झाले.
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही । Maval Lok Sabha
– विजय जाधव यांच्या उपस्थितीत मावळ तालुका काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक; संघटनात्मक बांधणीसाठी खास नियोजन
– मावळच्या विकासासाठी ‘भारत विकास ग्रुप’ कंपनीची आमदार सुनिल शेळकेंना साथ; इंद्रायणी भात पीक वाढीसाठी करणार प्रयत्न