Dainik Maval News : राज्यभरातील भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. मावळ तालुक्याचे महसूल केंद्र असलेल्या वडगाव येथेही भूमि अभिलेख कार्यालय असून या कार्यालयातील कर्मचारी देखील दिनांक पंधरा मे पासून काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे शेतकरी, सामान्य नागरिक यांची कोणतीही कामे होत नसून फरफट होत आहे. ( Maval Land Records Office employee strike continues )
- महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग संलग्न सरकारी कर्मचारी संघटना यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. मावळ भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी यामध्ये मुख्यालय सहाय्यक, अभिलेखपाल, भूकरमापक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, छाननी लिपिक, शिरस्तेदार, शिपाई हे देखील यामुळे एकप्रकारे संपवार आहेत.
भूमिअभिलेख च्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे भूमिअभिलेख कार्यालयातील जमिनीविषयीचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. मागील सात दिवसांपासून मावळ तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयात कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हातीच परतावे लागले आहे.
- तालुक्याचे मुख्यालय वडगाव ठिकाणी भूमिअभिलेख कार्यालयात शासकीय मोजणी, रेकॉर्ड, मोजणी नकाशे, गट नकाशे, शेतीचे प्रलंबित खटले अशा वेगवेगळ्या कामांसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. परंतू कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे येथील कामकाज ठप्प झाले असून याचा फटका तालुक्यातील सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना बसला आहे.
दरम्यान, तालुक्यातील अनेक नागरिकांना आंदोलनाची माहिती नसल्याने ते मावळ भूमिअभिलेख कार्यालयात कामासाठी येतात. परंतु कार्यालयात आल्यावर त्यांना आंदोलनाबाबत माहिती मिळते आणि नागरिकांना काम न झाल्याने निराळ होऊन परतत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News