Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघासह राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. 20) मतदान पार पडले. मावळ मतदारसंघातील 402 मतदान केंद्रावर अत्यंत शांततेत मतदान संपन्न झाले. मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती. परंतु लोणावळा व ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर रांगा असल्याने उशीरापर्यंत मतदान सुरु राहिले. अखेर रात्री उशीरा पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मावळात 72.10 टक्के मतदान झाले.
मावळ मतदारसंघात यंदा विक्रमी मतदान झाले. मावळ विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदार संख्या 3 लाख 86 हजार 172 मतदारांपैकी 1 लाख 44 हजार 16 पुरुष मतदारांनी मतदान केले. तर 1 लाख 34 हजार 414 महिला मतदारांनी मतदान केले. इतर दोन मतदार सहित एकूण 2 लाख 78 हजार 432 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मागील तीन निवडणुकांचा इतिहास काय?
मावळ विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या 3 लाख 48 हजार 462 होती. त्यापैकी 2 लाख 47 हजार 963 मतदारांनी मतदान केले होते. त्यावर्षी म्हणजे 2019 साली 71.16 टक्के मतदान झाले होते. यावर्षी मतदान प्रथमच 72 टक्क्यांपेक्षा अधिक विक्रमी मतदान झाले आहे. मागील निवडणुकीपेक्षा 30,469 पेक्षा जास्त मतदारांनी यावेळी मतदान केले आहे. या वाढलेल्या टक्क्याचा फायदा कुणाला होणार, सुनिल शेळके की बापूसाहेब भेगडे दोघांपैकी कोण बाजी मारणार, हे लवकरच समजेल.
2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीची आकडेवारी
मावळ विधानसभा निवडणूक – 2009
बाळा भेगडे (भाजपा) – 83,158 मते (मताधिक्य 14,318)
बापूसाहेब भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – 68,840 मते
रमेश साळवे (आरपीआय – ए) – 15,160 मते
मावळ विधानसभा निवडणूक – 2014
बाळा भेगडे (भाजपा) – 95,319 मते (मताधिक्य 28,001)
माऊली दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – 67,318 मते
किरण गायकवाड (काँग्रेस) – 17,624 मते
मावळ विधानसभा निवडणूक – 2019
सुनील शंकरराव शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – 1,67,712 मते (67.58%) (मताधिक्य 93,942)
बाळा भेगडे (भाजपा) – 73,770 मते (29.73%)
वंचित बहुजन आघाडी उमेदवार – 2,738 मते
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनिल शेळके यांचे पत्नी सारिका शेळकेंसह मतदान, लाखाच्या लीडने जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास । Maval Vidhan Sabha
– मावळ मतदारसंघातील उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क । Maval Vidhan Sabha
– मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी