आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पिंपरी चिंचवड या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीत प्रामुख्याने सुपर वॉरियर्स तयार करून त्यांच्यामार्फत जनसामान्यांपर्यंत केंद्र राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना पोहोचवणे, भारतीय जनता पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत नेणे आदी गोष्टींबद्दल सविस्तर चर्चा झाली. बैठकीमध्ये पिंपरी, चिंचवड व मावळ या तीन विधानसभा क्षेत्रातील वॉरीयर्सशी संवाद साधण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अंतर्गत बूथ सक्षमीकरणासाठी करावयास लागणाऱ्या गोष्टी, बूथ रचना सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी दिल्या गेल्या. सोशल मीडिया हा सध्याच्या राजकीय जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. या अनुषंगाने सोशल मीडिया संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच नमो चषक आयोजन आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयासाठी प्रत्येकाने एकजुटीने माजबुतीने कार्य करण्याचा संकल्प सदर बैठकीत करण्यात आला. ( Maval Lok Sabha Constituency BJP Core Committee meeting in Pimpri Chinchwad city )
आगामी निवडणुकीत भाजपाचा विजय मजबूत आणि दैदिप्यमान व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. सदर बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार श्रीमती उमा खापरे, आमदार महेश लांडगे, आमदार श्रीमती अश्विनी जगताप, जिल्हाध्यक्ष शंकर जगताप, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, मावळ लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द
– शौर्य दिन, 1 जानेवारी : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल, सरपंचपदी सोनाली जगताप यांचा दणदणीत विजय!