काँग्रेसच्या राजवटीमध्ये केंद्रातून 100 रुपये पाठवले की 15 रुपयेच सामान्यांपर्यंत पोहोचत होते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केल्यामुळे 100 टक्के निधी लोकांपर्यंत पोहोचत आहे. मोदी सरकारच्या निर्णयांची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी सूचना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 5 मे) लोणावळा येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चित्रा वाघ बोलत होत्या. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे आवश्यक आहे. त्यासाठी श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. ( Maval Lok Sabha Constituency BJP leader Chitra Wagh Campaigning mahayuti candidate Shrirang Barne )
यावेळी आरपीआय आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय तथा भाऊ गुंड, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण लाड, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, मावळ भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सायली बोत्रे, लोणावळा शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा विजया वाळुंज, लोणावळा शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाळेकर यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– मे अखेरपर्यंत इंद्रायणी नदीवरील पूल बांधून पूर्ण न झाल्यास मोठे जनआंंदोलन करण्याचा इशारा ! जाणून घ्या सविस्तर । Maval News
– वाघेरेंची ताकद दुपटीने वाढली, मराठा समाजाकडून मावळ लोकसभेत संजोग वाघेरेंना पाठींबा जाहीर ! वाघेरेंनीही दिले ‘वचन’
– मावळ लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर