Maval Lok Sabha Constituency Candidate Sanjog Waghere Property : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दिनांक 23 एप्रिल) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठे शक्तिप्रदर्शन करत आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत संजोग वाघेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या जवळ असलेली संपत्ती, त्यांच्यावरील गुन्हे, कुटुंबीयांची संपत्ती याची माहिती दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार संजोग वाघेरे हे कोट्यधीश असून त्यांच्या कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता 18 कोटी 41 लाख 64 रुपये इतकी आहे. वाघेरे यांनी त्यांचा मुलगा ऋषीकेश याला 1 कोटी 24 लाख 99 हजारांचे कर्ज दिले आहे तर पत्नी उषा यांना 96 लाख 89 हजार तात्पुरते कर्ज अर्थात हातउसने म्हणून दिले आहे. ( Maval Lok Sabha Constituency Candidate Sanjog Waghere property )
संजोग वाघेरे यांची संपत्ती :
जंगम मालमत्ता – 4 कोटी 46 लाख 36 हजार 494 रुपये
स्थावर मालमत्ता – 6 कोटी 85 लाख
एकूण – 11 कोटी 31 लाख 36 हजार 494 रुपये
पत्नी उषा संजोग वाघेरे यांची संपत्ती :
जंगम मालमत्ता – 1 कोटी 89 लाख 63 हजार 115 रुपये
स्थावर मालमत्ता- 5 कोटी 20 लाख रुपये
एकूण मालमत्ता – 7 कोटी 09 लाख 63 हजार 115
वाघेरे कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता – 18 कोटी 41 लाख 64 रुपये
संजोग वाघेरे यांच्यावरील कर्ज – 64,68,271 रुपये
उषा संजोग वाघेरे यांच्यावरील कर्ज – 2,33,84,551 रुपये
एकूण कर्ज – 2 कोटी 98 लाख 52 हजार 822 रुपये
तीन गुन्हे आणि पिस्तूल –
प्रतिज्ञापत्रानुसार संजोग वाघेरे यांच्यावर आंदोलनाचे तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्याकडे 50 हजार किमतीचे विदेशी बनावटीचे पिस्तूल देखील आहे. वाघेरे यांच्याकडे वाकड आणि पिंपरी येथे 5 निवासी मालमत्ता आहेत. परंतू महत्वाची बाब म्हणजे कोट्यधीश असूनही आणि मुलाला कोटीचे कर्ज देणारे संजोग वाघेरे तसेच त्यांच्या कोट्यधीश पत्नी उशा वाघेरे या दोघांकडेही स्वतःचे वाहन नाही.
अधिक वाचा –
– जोरदार शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha
– धक्कादायक! पुणे जिल्ह्यात कासारसाई आणि चाकण येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू । Pune News
– आदर्श जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात । Maval News