मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. कर्जत येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या 400 पेक्षा अधिक जागांवर भाजपचा उमेदवार विजयी झालाच पाहिजे, हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून कामाला लागण्याचा निर्णय घेण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
बैठकीला माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,चिंचवड मतदार संघाच्या आमदार अश्विनी जगताप,भाजपा पिं.चिं.शहर (जिल्हा) शहराध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप,प्रदेश सचिव विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील,प्रदेश सदस्य सदाशिव खाडे,माजी आमदार सुरेश लाड,मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे,प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे,पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री मकरंद देशपांडे;
कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्यासह मावळ लोकसभा मतदार संघातील पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी,संपूर्ण मंडळ कार्यकारिणी,सर्व मोर्चा-आघाडी -प्रकोष्ठ जिल्हा,प्रकोष्ठ मोर्चा कार्यकारिणी,सर्व सुपर वॉरियर्स,सर्व शक्ती केंद्र व बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. (Maval Lok Sabha Constituency Election 2024 Update BJP meeting at Karjat)
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांमध्ये साकव पुलांसाठी एकूण 2 कोटी 60 लाखांचा निधी, पाहा संपूर्ण यादी । Maval News
– लोणावळ्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का! उपशहरप्रमुखांसह अनेकांचा एकनाथ शिंंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती, राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय