Maval Lok Sabha Constituency : मावळ लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी (दि. 20 एप्रिल) वंचित बहुजन आघाडीने मावळ लोकसभेसाठी माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर केली. मावळ लोकसभा मतदारसंघाठी गुरुवारपासून (दि. 18 एप्रिल) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला झाला आहे. कर्जत येथील माधवी जोशी या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मावळ लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. परंतू, महाविकास आघाडीत मावळची जागा ही ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे माधवी जोशी यांनी शनिवारी (दि. 20) वंचितमध्ये प्रवेश करत थेट मावळ लोकसभेची उमेदवारी मिळविली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
माधवी जोशी यांच्यामुळे अर्थात वंचितच्या एन्ट्रीमुळे मावळ लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. मावळ लोकसभेत महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत, तर पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी दादा गटाचे अन् पिंपरी-चिंचवडे माजी महापौर संजोग वाघेरे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहे, आणि त्यात वंचितच्या माधवी जोशी यांनाही उमेदवारी जाहीर झालीये. त्यामुळे मावळ लोकसभेची ही तिरंगी लढत अटीतटीची होणार हे निश्चित. ( Maval Lok Sabha Constituency Fight Between Three Candidates Shrirang Barne Sanjog Waghere Madhavi Joshi )
दरम्यान वंचितच्या उमेदवारामुळे मतांची विभागणी होणार, हेही दिसतंय. याचे कारण गेल्यावेळी वंचितच्या उमेदवाराने (राजाराम पाटील) जवळपास लाखभर मते घेतली होती. आता यावेळी माधवी जोशी या वंचितच्या उमेदवार आहेत. त्यांनी स्वतः वर्षभर निवडणूकीसाठी कंबर कसली होती. त्यात त्या घाटाखालून म्हणजेच कर्जत येथून येतात. घाटाखाली मावळ लोकसभेतील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे जोशींना तिथे मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात तिरंगी लढतीमुळे संपूर्ण मावळ लोकसभेत होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा नक्की कोणाला होतो, हे 4 जून रोजीच समजेल.
अधिक वाचा –
– Maval Lok Sabha : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी
– उष्माघात म्हणजे काय? लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी? उष्णतेच्या लाटेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या
– पाच हजार नागरिकांना घडविणार अयोध्या दर्शन, मोरया प्रतिष्ठानचा संकल्प, नावनोंदणी सुरु । Vadgaon Maval