व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काय सांगता ? अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मावळ लोकसभेसाठी ‘संजय वाघेरे’ नावाने उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha

सर्वांनाच ठाऊक आहे की, मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे हे उमेदवार आहेत. तर, दोन वेळचे खासदार तसेच महायुतीचे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 26, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
काय सांगता ? अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मावळ लोकसभेसाठी ‘संजय वाघेरे’ नावाने उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशभर लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. मावळ लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी आज अर्थात गुरुवार, 25 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे मावळ लोकसभेसाठी आज शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यात संजय सुभाष वाघेरे नावाच्या व्यक्तीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मुळ नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील संजय सुभाष वाघेरे नावाच्या व्यक्तीने आज, मावळ लोकसभेसाठी अखेरच्या दिवशी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर राहायला घर नसणाऱ्या संजय वाघेरे यांच्या उमेदवारी अर्जाची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. 2014 साली नाशकातून दहावी पास झालेल्या संजय वाघेरे या उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्याने चर्चा सुरु झाली आहे. ( nomination form filed for Maval Lok Sabha in name of Sanjay Waghere on last day of filing nomination form )

सर्वांनाच ठाऊक आहे की, मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे हे उमेदवार आहेत. तर, दोन वेळचे खासदार तसेच महायुतीचे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मावळ लोकसभेत खरी लढत ही वाघेरे आणि बारणे यांच्यात होणार अशी परिस्थिती दिसत आहे. अशात संजोग वाघेरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या उमेदवाराच्या अर्जामुळे मविआ गोटात धक्का बसलाय.

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार संजय सुभाष वाघेरे हे उमेदवार मु. बंधारपाडा, पोस्ट कोशिंबे, ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव इंदिरा संजय वाघेरे आहेत. या दोन्ही पतीपत्नीच्या नावे एकूण 2 लाख 5 हजाराची संपत्ती आहे. दोघांकडेही स्वतःचे असे घर नाही.

अधिक वाचा –
– ना कुठली चर्चा, ना कोणता गाजावाजा ! मावळ लोकसभेसाठी ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी यांनी शांततेत भरला उमेदवारी अर्ज। Maval Lok Sabha
– अब्जाधीश ‘आप्पा’ ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property
– संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property


Previous Post

मावळ लोकसभा निवडणूकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती । Maval Lok Sabha

Next Post

संतापजनक ! अतिक्रमणाची बातमी लावली म्हणून पत्रकारांना शिवीगाळ आणि दमदाटी, कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । Maval Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
harassment of journalists

संतापजनक ! अतिक्रमणाची बातमी लावली म्हणून पत्रकारांना शिवीगाळ आणि दमदाटी, कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.