मावळ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माधवी जोशी यांची एन्ट्री झाली आहे. माधवी जोशी यांनी आज (दिनांक 24 एप्रिल) रोजी त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे आता मावळ लोकसभेत तिरंगी लढत होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शनिवारी (दि. 20) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्यानंतर रविवारी (दि. 21) लगेचच माधवी जोशी यांना वंचितकडून मावळ लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. माधवी जोशी ह्या मागील वर्षभरापासून लोकसभेची तयारी करत आहेत. परंतू उमेदवारीसाठी त्यांना दोनदा पक्षांतर करावे लागले आहे. ( Maval Lok Sabha Constituency Vanchit Bahujan Aghadi Candidate Madhvi Joshi Filed Nomination Form )
बुधवारी कोणत्याही मोठ्या गाजावाज्याशिवाय आणि शक्तिप्रदर्शनाशिवाय माधवी जोशी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आग्री समाजाच्या माधवी जोशी या कर्जत येथील रहिवासी असून कर्जत भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्याशिवाय त्यांनी मागील वर्षभर केलेल्या पेरणीमुळे त्यांना निवडणूकीत काही जनाधार मिळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे मावळ लोकसभेत तिरंगी लढत होणार हे आता जवळपास निश्चित आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात यापूर्वीच महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 22) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर, महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अधिक वाचा –
– अब्जाधीश ‘आप्पा’ ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property
– संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property
– ‘श्रीरंग बारणे यांचा पराभव करून मी माझा भाऊ पार्थ पवार याच्या पराभवाचा वचपा काढणार’ – आमदार रोहित पवार । Maval Lok Sabha