सकल मराठा समाजाच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला आहे. खोपोली येथे 4 मे रोजी सकाळी पार पडलेल्या बैठकीमध्ये उपस्थित सकल मराठा समजाच्या सर्व समन्वयकांच्या वतीने हा एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण मराठा समाज संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करेल, असा विश्वास या बैठकीमध्ये संजोग वाघेरे यांना देण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संजोग वाघेरे यांनी लोकसभेमध्ये पहिला मुद्दा हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मांडला जाईल असे आश्वासन सकल मराठा समाजाला दिले. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सातत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला जाईल, असा शब्द देखील त्यांनी समाजाला दिला आहे. ( Maval Lok Sabha Election Maratha Samaj Declared Support to Sanjog Waghere Patil )
मनोज जरांगे पाटील यांनी, लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची ताकद दाखवा आणि ज्यांनी आपल्या गुलालाचा अपमान केला, ज्यांच्यामुळे माय भगिनींचे रक्त सांडले, त्यांना दणकून पाडा, असे सांगितले होते. जरांगेंच्या या सूचनांनंतर सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक 3 मे रोजी खोपोली येथे झाली. त्या बैठकीत कर्जत, खालापूर, खोपोली, पनवेल, उरण येथील सकल मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते. जवळपास 2 तास बैठक सुरु होती.
मावळ लोकसभेसाठी 33 उमेदवार असेल तरीही, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात थेट लढत होणार असल्याने सकल मराठा समाजाने संजोग वाघेरे पाटील यांनाच मतदान करू, असे सर्वांनी एकमताने ठरवले. परंतू वाघेरे पाटीलांची मराठा समाजासंदर्भात भूमिका काय आहे, ते जाणून घेण्यासाठी पुन्हा 4 मे रोजी सकाळी 9 वाजता सकल मराठा समाज रायगड (मावळ मतदार संघ) यांची बैठक खोपोली येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीला उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे आले. तेव्हा सकल मराठा समाज समन्वयकांनी त्यांना बैठकीत, आपली मराठा समाजासंदर्भात भूमिका काय आहे, अशी विचारणा केली.
त्यावर वाघेरे यांनी, ‘मी पहिल्यापासून मराठा आंदोलनात एक कार्यकर्ता म्हणून सहभागी आहे. मी निवडून आल्यानंतर संसदेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडेल. आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करीन. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत शांत बसणार नाही. मी नेहमी मराठा समाजासोबत राहीन,’ असा शब्द मराठा समाजाला दिला. तेव्हा उपस्थित सर्व मराठा समाज बांधवानी एकमताने संजोग वाघेरे पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिला.
सदर बैठकीला सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील, विनोद साबळे, रायगड जिल्हा समन्वयक शंकर थोरवे, गणेश कडू, उमेश महसे, प्रकाश पालकर, अनिल भोसले, मारुती पाटील, धनश्री दिवाणे, किरण हाडप, उत्तम भोईर, जे.पी. पाटील, भानुदास पालकर, सुरेश बोराडे, नितीन मोरे, अविनाश तावडे, दीपक लाड, एकनाथ पिंगळे, राजन सुर्वे, अविनाश तावडे, मनोहर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभेत महायुतीत खदखद, त्यामुळे थेट दिल्लीतून आलंय पथक ? पाहा काय झालं या पथकाचं… । Maval Lok Sabha
– टिळा झाल्यावर होणाऱ्या नवऱ्याचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने तरूणीची आत्म’हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval Crime
– ‘मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहिल’ – आमदार सुनिल शेळके