व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळ लोकसभेच्या विकासासाठी ‘मशाल’ चिन्ह लक्षात‌ ठेवा’, संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना ठाकरे गटाचे तथा महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा प्रचार जोरात सुरु असल्याचे दिसत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 15, 2024
in मावळकट्टा, महाराष्ट्र
Sanjog Waghere Maval Lok Sabha

Photo Courtesy : FB / Sanjog Waghere


‘मावळ लोकसभा मतदारसंघात ज्यांना संधी दिली, त्यांनी स्वतःसाठीच काम केले. मतदारसंघाकडे आणि मतदारसंघातील नागरिकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे मावळच्या विकासासाठी आणि गाव पातळीवरील विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे “मशाल” चिन्ह लक्षात ठेवा,’ अशी साद घालत शिवसेना ठाकरे गटाचे तथा महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा प्रचार जोरात सुरु असल्याचे दिसत आहे. त्यांच्या गावभेट दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संजोग वाघेरे पाटील ह्यांनी नुकताच खालापूर तालुक्यातील (जि. रायगड) वडगाव भागात गावभेट दौरा केला आणि परिसरातील मतदारांशी संवाद साधला. या दौर्‍यामध्ये परिसरातील ग्रामस्थांनी वाघेरेंचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. तसेच माता भगिनींनी संजोग वाघेरे यांचे औक्षण करत स्वागत केले. यावेळी वडगाव जिल्हा परिषद वॉर्डातील महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( Maval Lok Sabha Mahavikas Aghadi candidate Sanjog Waghere visits village in Khalapur taluka )

संजोग वाघेरे यांनी वडगाव जिल्हा परिषद विभागातील तूपगाव, पाली, सारंग, असरोटी, वयाल, बोरिवली, वडगाव, कैरे, कोपरी, लोहोप, माजगाव, वारद, पौंध, आसरेवडी, धारणी, खरसुंडी, वडवळ, तांबटी या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी सवांद साधला. यावेळी संबंधित गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक – युवक आणि मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक ठिकाणी कोपरा सभा पार पडल्या. या सभांमध्ये मावळ लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गावांमधील प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. युवा पिढीबाबत बोलताना त्यांनी, देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांनी पदवीऐवजी व्यावसायिक कौशल्यावर विश्वास ठेवायला हवा. येणार्‍या काळात बेरोजगारीची समस्या सोडविल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन दिले.

अधिक वाचा –
– ‘समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल?’ श्रीरंग बारणे म्हणाले, ‘समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही…’
– देवघर येथे रंगला एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी मिरवणूक सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती । Karla Ekvira Devi Yatra
– किल्ले तिकोणा गडावर यंदाही जल्लोषात साजरी होणार श्रीराम नवमी । Tikona Fort


Previous Post

शाब्बास…! एकविरा विद्या मंदिर शाळेचे 5 विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षा गुणवत्ता यादीत चमकले । Karla News

Next Post

Maval Lok Sabha : श्रीरंग बारणे यांना मोठा धक्का! महायुतीतील प्रमुख घटक पक्षाला खिंडार, ठाकरेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sanjog Waghere Maval Lok Sabha

Maval Lok Sabha : श्रीरंग बारणे यांना मोठा धक्का! महायुतीतील प्रमुख घटक पक्षाला खिंडार, ठाकरेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.