व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Maval Lok Sabha : श्रीरंग बारणे यांना मोठा धक्का! महायुतीतील प्रमुख घटक पक्षाला खिंडार, ठाकरेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मोठा धक्का बसला आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्षाला खिंडार पडल्याने बारणेंना हा झटका बसला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 15, 2024
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Sanjog Waghere Maval Lok Sabha

Photo Courtesy : FB / Sanjog Waghere


मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मोठा धक्का बसला आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्षाला खिंडार पडल्याने बारणेंना हा झटका बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी हाती शिवबंधन बांधले आहे. ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात हा पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला. यानिमित्ताने महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपाला पनवेल मध्ये खिंडार पडल्याचे दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नाने खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा आणि पनवेल महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका लिना गरड, उद्योजक मधु पाटील, मनसेचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष प्रशांत शिवाजीराव अनगुडे, शिंदे गटाच्या जान्हवी घाडगे, भाजप उत्तरप्रदेश सेलचे गजेंद्र सिंग, विनय दुबे, नवीन पनवेल भाजपचे वार्ड अध्यक्ष तथा पेण तालुका रहिवाशी संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र किशोर म्हात्रे, समाज सेवक शशिधर माळी, भाजपचे आकाश म्हात्रे, किरण म्हात्रे, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी दादर येथील शिवसेना भवनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. ( Maval Lok Sabha Mahayuti Candidate Shrirang Barane Get Shocked BJP Officials Join Shiv Sena UBT Party )

यावेळी शिवसेना नेते तथा कोकण संपर्क नेते सुभाष देसाई , शिवसेना उपनेते विजय कदम, मावळ लोकसभा संघटक तथा खासदारकीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, युवासेना सहसचिव अवचित राऊत, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, शहर प्रमुख खारघर गुरुनाथ पाटील, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, ग्रामीण विभागप्रमुख दत्ता फडके, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सुजाता कदम, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, नवीन पनवेल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक’, नात्यागोत्याच्या राजकारणावर श्रीरंग बारणेंचे रोखठोक उत्तर
– ‘समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल?’ श्रीरंग बारणे म्हणाले, ‘समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही…’
– देवघर येथे रंगला एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी मिरवणूक सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती । Karla Ekvira Devi Yatra

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

‘मावळ लोकसभेच्या विकासासाठी ‘मशाल’ चिन्ह लक्षात‌ ठेवा’, संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

घराणेशाहीच्या नावाने बोंब मारणाऱ्या भाजपाने दिलेत सर्वाधिक घराणेशाहीतले उमेदवार, इतर पक्षांची काय स्थिती? – वाचा विशेष बातमी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Family in Maharashtra politics

घराणेशाहीच्या नावाने बोंब मारणाऱ्या भाजपाने दिलेत सर्वाधिक घराणेशाहीतले उमेदवार, इतर पक्षांची काय स्थिती? - वाचा विशेष बातमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.