दिनांक 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, “केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वच घटकांतील लोकांना दिलासा मिळाला आहे. पहिल्यांदा मध्यमवर्गीयांनाही मोठा दिलासा दिला आहे.” ( Maval Lok Sabha MP Shrirang Barane Detailed Reaction On Union Budget 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यासाठी 9 हजार कोटी रुपयांचा अधिकचा निधी दिला जाणार आहे. सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योगांसाठी क्रेडिट सिस्टीम फायदेशीर ठरणार आहे. औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. लघुउद्योगाला बळकटी येईल. विकास आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.”
“शेतक-यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महिला सन्मान बचतपत्र योजना जाहीर केले आहे. या योजनेत 2 लाख रुपये गुंतवणुकीची संधी. वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी अॅपवर सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याची योजना आणली जाणार आहे.”
केंद्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण @nsitharaman यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. @DrSEShinde @DrBhagwatKarad @ashokyadavmp @UnmeshPatilBjp @BJP4Maharashtra pic.twitter.com/TyjCrmS87B
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) February 1, 2023
“पंतप्रधान आवास योजनेसाठी आर्थिक तरतूद 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी रुपये केली जाणार आहे. शहर पायाभूत विकास निधीसाठी दरवर्षी 10 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे शहरविकासाला वेग येईल. पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प” असल्याचे खासदार बारणे म्हणाले.
अधिक वाचा –
– केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा, देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभारणार
– गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन मिळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा!
– केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा! पंतप्रधान आवास योजनेसाठी 79 हजार कोटींचा निधी, तब्बल 66 टक्क्यांची वाढ
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारची आदिवासी समुदायांसाठी मोठी घोषणा, देशात पीएम पीव्हीटीजी योजना राबवणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : मोदी सरकारचे ‘मिशन सप्तर्षी’, ‘या’ सात घटकांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प, जाणून घ्या
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : भारतीय रेल्वेसाठी तब्बल 2.4 लाख कोटींचा निधी ते देशात 50 नवीन विमानतळे उभारणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : महिला वर्ग आणि शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या अनेक मोठ्या घोषणा, लगेच वाचा…