भांगरवाडी, लोणावळा येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्ष आणि घटक पक्षांची संयुक्त बैठक संपन्न झाली. यावेळी लोणावळ्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विभागप्रमुख विशाल पाठारे, माजी शाखाप्रमुख नरेश घोलप, उद्योजक नंदू कडू तसेच संजय पडवळ, संतोष शिंत्रे, विजया पाटेकर, पद्मजा पूलरवार, उत्तर भारतीय आघाडीचे दिलीप दुबे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
या बैठकीला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या समवेत लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, युवा सेना प्रमुख विवेक भांगरे, महिला आघाडी प्रमुख मनीषा भांगरे, मुस्लिम बँकेचे संचालक जाकीर खलिफा, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कमलसिंग म्हस्के, माजी नगरसेवक देविदास कडू, तसेच सुनील हागवणे, राम सावंत, दत्ता चोरगे, विशाल हुलावळे, सुधाताई सोमण आदी पदाधिकारी उपस्थित होते. ( Maval Lok Sabha Uddhav Thackeray group leaders join Eknath Shinde Shiv Sena party )
अधिक वाचा –
– वर्षानुवर्षांची पायपीट थांबणार.. कळकराई-मोग्रज रस्त्याला वनविभागाचा हिरवा कंदील! कळकराईकरांना गुढीपाडव्याला गोड भेट
– तब्बल एका तपानंतर कॉलेजच्या कट्ट्यावर ‘ते’ पुन्हा भेटले..! आंबी येथील कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर
– लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथे मावळ भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न । Vadgaon Maval