दहा दिवस भक्तांच्या घरी विराजमान झालेले बाप्पा शुक्रवारी (9 सप्टेंबर) आपल्या गावी निघाले. गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीची ( Ganpati Visarjan 2022 ) सर्वत्र धामधुम सुरु आहे. तब्बल दोन वर्षांनंतर कोरोनाच्या कुठल्या निर्बंधांशिवाय गणेशोत्सव होत असल्याने विसर्जन मिरवणूकीत पारंपारिक ढोल-ताशा पथकांसह डिजे, डॉल्बीचाही समावेश दिसत आहे. लहान-थोर यांसह राजकारणी नेते मंडळीही या विसर्जन मिरवणूकीचा आनंद घेताना दिसत आहेत.
थेरगाव येथील सम्राट मित्र मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले. या विसर्जन मिरवणूकीत मावळ लोकसभा ( Maval Loksabha ) मतदार संघाचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे ( MP Shrirang Barne ) हे सभागी झाले होते. यावेळी खासदार बारणे यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खासदार बारणे स्वतःच्या कमरेला ढोल बांधून ढोल-ताशा पथकात सामील झाले आणि त्यांनी मनसोक्त ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. ( Maval Loksabha MP Shrirang Barne Played Dhol Ganpati Visarjan 2022 Video )
अधिक वाचा –
पुढच्या वर्षी लवकर या! मावळ तालुक्यात घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन
खासदार बारणेंची मतदारसंघातील सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेट