मावळ तालुक्याचे ( Maval Taluka ) विद्यमान आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke ) यांचा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो. यंदा आमदार शेळकेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील त्यांचे समर्थक, कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. तर, काही ठिकाणी समाजपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने कर्जत-जामखेडचे युवा आमदार @RRPSpeaks यांच्या शुभहस्ते व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मावळातील ४३गावातील जिल्हा परिषद शाळांना माझ्या वाढदिवसानिमित्त वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. pic.twitter.com/82cZnFseOz
— Sunil Shelke (@shelkesunilanna) October 17, 2022
मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील 43 गावातील जिल्हा परिषद शाळांना आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. ( Maval MLA Sunil Shelke Birthday Water Purifiers Gift To Zilla Parishad schools )
तसेच, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तळेगाव दाभाडे शहर यांच्या वतीने 400 गरजू महिलांना आमदार शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त साडी आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्षा शैलजा काळोखे, संध्या देसाई, कलिका घुले, मंजुश्री बारणे, रश्मी जगदाळे, निलम रोहिटे, उज्वला जाधव, निलिमा गुंजाळ, विद्या शिळीमकर, निलिमा शिंदे, उषा शिळीमकर, मनीषा रघुवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
Video : पवनानगर येथील कीर्तनाला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती, आमदार शेळकेंचा वाढदिवसही साजरा
रस्ता सुरक्षाविषयक उपाययोजना आणि सुधारित धोरण ठरवण्याबाबत उच्चस्तरिय बैठक, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
शिळींबमध्ये चोरट्यांनी दुकान फोडलं, गावातल्या मुख्य चौकातील किराणा दुकानातून हजारोंचा माल लंपास