Pavana Dam Affected Farmers News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात असणाऱ्या पवना धरणाच्या बांधकामानंतर येथे प्रकल्पबाधित झालेल्या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी मागील 50 वर्षांहून अधिक काळ लढा देत असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या मागण्या बुधवारी (दि. 12 जून) मार्गी लागल्या आहेत. पवना धरणग्रस्त 764 खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन परत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सर्व प्रकल्पबाधित शेतकरी आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्व सरकार दरबारी लावून धरला होता. तसेच आमदार शेळके यांनी त्यांच्या आमदारकीच्या कारकीर्दीत मागील साडेचार वर्षे यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न केले होते. या सर्वांच्या प्रयत्नांना आता अखेर यश आले आहे. ( maval pavana dam affected 764 farmers will get 4 acres of land each decision by rehabilitation minister anil patil )
मंत्री अनिल पाटील यांच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढील प्रमाणे ;
1. प्रत्येक धरणग्रस्ताला 4 एकर – पवना धरणग्रस्त प्रत्येक खातेदाराला चार एकर क्षेत्र वाटप करण्यात येणार.
2. दोन एकर क्षेत्र धरण परिसरात देण्यात येणार.
3. दोन एकर क्षेत्र जिल्ह्यात इतर ठिकाणी.
4. एकूण 764 खातेदारांना सुमारे 1839 एकर क्षेत्रापैकी 1528 क्षेत्र पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे.तसेच सुमारे 311 एकर क्षेत्रामध्ये रस्ते,ओढे, नाले, वने व धरण सुरक्षेकरिता क्षेत्र ठेवले जाणार आहे.
5. ज्या शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत परंतू ते खातेदार नाहीत, अशा शेतकऱ्यांना देखील समाविष्ट केले जाणार. त्या शेतकऱ्यांनी सर्व माहिती व कागदपत्रांसह पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडून संपूर्ण प्रस्ताव आठ दिवसांमध्ये पुनर्वसन विभागाकडे मंत्रालय स्तरावर पुढील आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश मा.मंत्री महोदयांनी दिले आहेत. त्यानंतर पुढील आठ दिवसात अंमलबजावणी केली जाईल.
मंत्री अनिल पाटील यांचा निर्णय आणि हजारो मावळवासियांना दिलासा –
पवना धरणग्रस्त प्रत्येक खातेदाराला चार एकर क्षेत्र वाटप करण्याच्या निर्णयावर पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या बैठकीत शिक्कामोर्तब केले. खातेदारांना दोन एकर क्षेत्र धरण परिसरात देण्यात येणार असून उर्वरित दोन एकर क्षेत्र पुणे जिल्ह्यात इतर ठिकाणी देण्यात येणार आहे. एकूण 764 खातेदारांना सुमारे 1,839 एकर क्षेत्रापैकी 1,528 क्षेत्र पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे तसेच सुमारे 311 एकर क्षेत्रामध्ये रस्ते,ओढे, नाले, वने व धरण सुरक्षेकरिता क्षेत्र ठेवले जाणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
ज्या शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत, परंतु ते खातेदार नाहीत, अशा शेतकऱ्यांना देखील या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांनी सर्व माहिती व कागदपत्रांसह पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडून संपूर्ण प्रस्ताव आठ दिवसांमध्ये पुनर्वसन विभागाकडे मंत्रालय स्तरावर पुढील आठ दिवसात सादर करावा, असे निर्देश मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
“प्रत्येक खातेदाराला चार एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्री महोदयांनी दिला असून दोन एकर क्षेत्र मावळ तालुक्यात व दोन एकर क्षेत्र दुसऱ्या तालुक्यात देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाल्याचे समाधान आहे. मावळच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या व धरणग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वतीने आपण महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो,” – आमदार सुनिल शेळके
1972 मध्ये झाले होते धरणाचे बांधकाम –
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पवना धरणासाठी मावळातील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. 1965 मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आणि 1972 मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पातील काही बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु उर्वरित खातेदार मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते.
अधिक वाचा –
– ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या । दैनिक मावळ विशेष
– जवण – तुंग मार्गावर जीवघेणे खड्डे ! वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार ? सामान्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास
– ‘राज्यात आमचे 105 आमदार तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री’, प्रवीण दरेकरांनी श्रीरंग बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले । Pravin Darekar criticizes MP Shrirang Barne