व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपा नेते रविंद्र भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ढोल-झांज पथक स्पर्धा, वडगावात होणार ‘मावळरत्न’ पुरस्काराचे वितरण । Maval News

मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे मावळ विधानसभा प्रमुख रविंद्र (आप्पा) आण्णासाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळरत्न पुरस्कार आणि अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 24, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval BJP Leader Ravindra Bhegde Birthday

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याचे सृजनशील नेतृत्व तथा मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे मावळ विधानसभा प्रमुख रविंद्र (आप्पा) आण्णासाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळरत्न पुरस्कार आणि अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी अर्थात 25 जुलै रोजी रविंद्र भेगडे यांचा वाढदिवस असून त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या पुरस्कार विरतरण सोहळ्याचे वडगाव मावळ येथे आयोजन करण्यात आले असून सोबतच भव्य ढोल-झांज पथक स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रविंद्र आप्पा भेगडे मित्र परिवार यांच्या वतीमे या संपूर्ण सोहळ्याचे आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, दि. 25 जुलै रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान वडगाव मावळ येथील जुण्या मुंबई-पुणे हायवे लगत असणाऱ्या भेगडे लॉन्स येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मावळ तालुक्याच्या जडणघडणीत योगदान देणारे विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा यावेळी ‘मावळरत्न’ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. तसेच रविंद्र आप्पा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. ( Maval Ratna Award and Dhol Competition on occasion of Maval BJP Leader Ravindra Bhegde Birthday 25th July )

मावळरत्न पुरस्काराचे पुरस्कारार्थी –
हभप प्रा डॉ सदानंद मोरे – संत साहित्याचे ज्येष्ठ अध्यापक
श्री रामदास आप्पा काकडे – प्रसिद्ध उद्योजक
श्री बाळासाहेब महाराज काशीद (पाटील – अध्यक्ष, श्री क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट
श्री सुर्यकांतजी वाघमारे साहेब – पश्चिम महाराष्ट्र प्रमुखष रि.पा.ई. (आ.)
सौ. सुरेखाताई जाधव – मा. नगराध्यक्षा, लोणावळा न.प.
श्री रामनाथशेठ वारिंगे – प्रसिद्ध बैलगाडा मालक
कु. सेजल विश्वनाथ मोईकर – आंतरराष्ट्रीय खेळाडू
वरील सात पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते मावळरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणात आहे.

मदनजी बाफना साहेब महाराष्ट्र राज्य), संजय उर्फ बाळा भेगडे (माजी राज्यमंत्री – महाराष्ट्र राज्य), पै. चंद्रकांतदादा सातकर (ज्येष्ठ नेते, मावळ), बापूसाहेब (आण्णा) भेगडे (उपाध्यक्ष, संत तुकाराम सह. साखर कारखाना), ज्ञानेश्वर उर्फ माऊली दाभाडे (संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक), गणेश किसनराव भेगडे (अध्यक्ष – भाजपा, किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश), श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे सरकार (मा. नगराध्यक्षा – तळेगाव दाभाडे नगरपरिषद), बाळासाहेब नेवाळे (संचालक, दुध उत्पादक संघ, पुणे जिल्हा), बबनराव भेगडे (मा. अध्यक्ष – पुणे पीपल्स बँक) या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

यावेळी भारतीय किसान संघाचे ज्येष्ठ नेते शंकरराव शेलार, माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब जांभुळकर, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत शेटे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्र नाना दाभाडे, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, पंचायत समिती मावळचे माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटे, पंचायत समिती मावळचे माजी सभापती धोंडिबा नाना मराठे, संत तुकाराम सह. साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव पवार, मावळ भाजपाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, मावळ भाजपाचे माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एकनाथराव टिळे, पंचायत समिती मावळचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, पंचायत समिती मावळचे माजी सभापती राजाराम शिंदे, मावळ भाजपाचे माजी अध्यक्ष सुकनशेठ बाफना, संत तुकाराम सह. साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव टाकवे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम काजळे, लोणावळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, मावळ भाजपाचे विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय भाऊ गुंड, देहूरोड शहर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र उर्फ लहूमामा शेलार, तळेगाव शहर भाजपाचे माजी अध्यक्ष अशोक दाभाडे, लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष अरूण लाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

भव्य ढोल-झांज पथक स्पर्धेचे आयोजन –
या सोहळ्याच्या पूर्वी भव्य ढोल – झांज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात प्रथम क्रमांक विजेत्या पथकाला 51 हजार रुपये, द्वितीय क्रमांक विजेत्या पथकाला 41 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक विजेत्या पथकाला 31 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सोबतच प्रत्येक विजेत्या संघाला एक ढोल आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. यासह स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक पथकाला 11 हजार रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट ढोल वादकाला 1 ढोल आणि सन्मानचिन्ह आणि उत्कृष्ट ताशा वादकाला 1 ताशा आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. ही स्पर्धा गुरूवारी, दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भेगडे लॉन्स, वडगाव मावळ येथे होणार आहे. तर या स्पर्धेचे बक्षीस वितरण त्याच दिवशी दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत होणार आहे.

अधिक वाचा –
– आरोपींना फाशी द्या, पीडित कुटुंबाला न्याय द्या ! मावळातील तिहेरी हत्याकांडाचा मुस्लीम समाजाकडून निषेध, प्रशासनाला निवेदन
– ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तळेगाव शहर भाजपा अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना धक्का । Talegaon Dabhade
– शिळींब सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी भगवान दरेकर ; चेअरमन, व्हाइस चेअरमन पदाधिकाऱ्यांची देखील बिनविरोध निवड । Maval News


Previous Post

पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News

Next Post

लोणावळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, पदाधिकाऱ्यांनी देखील केले रक्तदान । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
blood donation camp Lonavala

लोणावळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, पदाधिकाऱ्यांनी देखील केले रक्तदान । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
MLA Sunil Shelke attention in session regarding issues in Dehuroad Cantonment area

रेडझोनचा प्रश्न, शिक्षण – आरोग्य – पाण्याची समस्या ; देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात लक्षवेधी

March 12, 2026
Agriculture Minister Dattatreya Bharane

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेणार – कृषी मंत्री

March 12, 2026
Katkari community gets benefit of Rs 2 lakh 39 thousand from government for building house with toilet

शौचालय सहीत घरकुल बांधणीसाठी कातकरी समाजाला सरकारकडून मिळतो २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ

March 12, 2026
Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.