व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 28, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही? मावळातील डी. वाय. पाटील कॉलेजच्या प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप

तळेगाव आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात शाळा व्यवस्थापनाकडून मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 6, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, व्हिडिओ, शहर
Principal-Assaulted-Bajrang-Dal

Photo - Team Dainik Maval


मावळ तालुक्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तळेगाव आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात शाळा व्यवस्थापनाकडून मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कॉलेजचे प्राचार्य अलेक्झांडर यांच्याच संमतीने हा प्रकार घडला असून सदर ख्रिश्चन प्राचार्य हा कॉलेजात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला आहे. तसेच ही बाब पुढे आल्यानंतर पालक वर्ग आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी सदर प्राचार्यांना चोप दिल्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यात एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच डी. वाय. पाटील महाविद्यालयातील या प्रकाराने सर्वत्र खळबळ माजली आहे. मुलींच्या प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसल्याचे पालकांनी सांगितले. तशी तक्रार पोलिसांकडे देखील करण्यात आली. बजरंग दल सारख्या हिंदू संघटनांनी या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला, तेव्हा महाविद्यालयात फक्त ख्रिश्चन प्रार्थना घेतली जाते असा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण केली. तसेच प्राचार्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, अशी मागणी देखील बजरंग दलाने केली आहे. ( Maval Talegaon News D Y Patil Collage Principal Assaulted By Bajrang Dal Activists For Installing CCTV Camera In Girls Toilet )

बजरंग दलाने प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाण केली असता एकच गोंधळ उडाला. तसेच पोलिसांनी देखील गांभीर्य ओळखत ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. मावळ तहसीलदारांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने मात्र आता याबद्दल बोलण्यास नकार दिला असून यासंदर्भात मौन बाळगले आहे. त्यामुळे महिला-मुलींच्या प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते की नाही, हे स्पष्ट झालेेले नाही.

अधिक वाचा –
– ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ : मावळच्या भावी खासदार… माधवी जोशी यांच्याकडून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन
– मोठी बातमी! कान्हे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ : मावळच्या भावी खासदार… माधवी जोशी यांच्याकडून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन

Next Post

आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून मावळ तालुक्यातील 50 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Jayant-Asgaonkar

आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून मावळ तालुक्यातील 50 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव नगरपंचायत निवडणूक : दुबार मतदारांबाबत मुख्याधिकाऱ्यांची सूचना, ३० ऑक्टोबरपर्यंत लेखी अर्ज देण्याचे आवाहन

October 28, 2025
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजना : मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाऊल, जाणून घ्या योजनेविषयी । Lake Ladki Yojana

October 28, 2025
Megha Bhagwat handed over nomination paper for Indori Varale group to MLA Sunil Shelke

आपुलकीचा संवाद साधत मेघाताई भागवत यांनी आमदार सुनील शेळकेंकडे सुपूर्द केला इंदोरी-वराळे गटासाठीचा उमेदवारी अर्ज

October 28, 2025
Local body elections New options in Maval taluka through Maha Vikas Aghadi

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार चुरशीच्या ; इच्छुक उमेदवारांना मिळाला नवा पर्याय । Maval Politics

October 28, 2025
Opposition in Mumbai but together in Maval Congress and MNS will contest elections as MahaVikasAghadi in Maval

मुंबईत विरोध पण मावळात सोबत ! काँग्रेस (आय) आणि मनसे मावळ तालुक्यात महाविकासआघाडी म्हणून निवडणूक लढविणार

October 27, 2025
5 parties in Maval taluka will contest local body elections as Mahavikas Aghadi mns ncp sp shivsena ubt vba congress

ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार । Maval Taluka Politics

October 27, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.