मावळ तालुका ( Maval Taluka ) भारतीय जनता पार्टी ( Bharatiya Janata Party ) मासिक बैठक पक्ष कार्यालय वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथे मंगळवार (1 नोव्हेंबर) रोजी पार पडली. यावेळी संघटनात्मक कार्याचा आढावा घेत आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक कार्यासंदर्भात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. ( Maval Taluka Bharatiya Janata Party Monthly Review Meeting At Vadgaon City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बैठकीवेळी मावळ तालुका खादी ग्राम उद्योग संचालक पदी पत्रकार सुदेश गिरमे आणि गणेश भांगरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. तसेच, तसेच भारतीय जनता पार्टी पवनमावळ विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष पदी सोमनाथ बोडके यांची निवड करण्यात आली आणि त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ नेते शांताराम काजळे, माऊली शिंदे, राजाराम शिंदे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम,सरचिटणीस सुनिल चव्हाण, मच्छिंद्र केदारी, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता भाऊ कुडे, संतोष कुंभार, किरण राक्षे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, सोशल मीडिया आघाडी अध्यक्ष सागर शिंदे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवनमावळ भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्षपदी सोमनाथ बोडके यांची निवड
– ठाकुरसाई – गेव्हंडे खडक ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अरविंद रोकडे, 5-3च्या फरकाने मारली बाजी