सालाबाद प्रमाणे मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा साईबाबा सेवाधाम कान्हे (ता. मावळ) या ठिकाणी पार पडली. राष्ट्रपती पुरस्कृत ह.भ.प. पांडुरंग कार्लेकर गुरूजी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. ह्या सभेला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कुंभार समाज-बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. ( Maval Taluka Kumbhar Samojonnati Mandal New Executive Committee Announced See Name List )
कुंभार समाजोन्नती मंडळाचे जिल्हा अध्यक्ष – संतोष कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष – बाबाजी कुंभार, जिल्हा कोषाध्यक्ष – दत्ता बावधनकर, जिल्हा सचिव – संदिप कर्डेकर, मावळते अध्यक्ष – तानाजी दरेकर, युवक अध्यक्ष – जयंत कुंभार इत्यादींनी आपापली मनोगते व्यक्त केली. मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळ ही संघटना अव्याहतपणे गेली सतरा वर्षांपासून कार्यरत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन ह.भ प. मारुती कुंभार गुरूजी यांनी केले. आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष तानाजी दरेकर यांनी केले. तर अध्यक्षीय मार्गदर्शन ह.भ.प. पांडुरंग कार्लेकर गुरूजी यांनी केले.
या सभेत सर्वानुमते संघटनेची नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे;
अध्यक्ष – संतोष गामण्णा कुंभार (लोणावळा )
कार्याध्यक्ष – विशाल ज्ञानेश्वर दरेकर (नवलाख ऊंबरे)
उपाध्यक्ष – शिवाजी कुंभार (कोथुर्णे)
सचिव – दिनेश गणेश कुंभार (कामशेत)
महिला आघाडी अध्यक्षा – रेणुका सुनील कुंभार (कान्हे)
युवक कार्याध्यक्ष – अनिकेत रामचंद्र कुंभार (हाडशीकर)
युवक उपाध्यक्ष – प्रशांत कुंभार
युवक उपाध्यक्ष – शिवराज शंकर नाणेकर (लोणावळा)
युवक उपाध्यक्ष – प्रमोद दरेकर (तळेगाव)
नुतन महिला आघाडी अध्यक्षा रेणुका कुंभार यांचा सत्कार माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा कुंभार, मावळत्या अध्यक्षा भारती संतोष कुंभार तसेच चित्कला दिनेश कुंभार तसेच नम्रता भोसले यांनी सन्मान करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच नुतन अध्यक्ष संतोष गामण्णा कुंभार यांना मावळते अध्यक्ष तानाजी दरेकर तसेच उपस्थित जिल्हा पदाधिकारी यांनी शाल श्रीफल देऊन सन्मानित केले. तसेच नुतन कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल सर्वांचे स्वागत करून सन्मानित करण्यात आले. ( Maval Taluka Kumbhar Samojonnati Mandal New Executive Committee Announced See Name List )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– “चंदा मामा अब नहीं दूर, चंदा मामा की बस एक टूर” – पंतप्रधान नरेंद्र मोदी; असं झालं चंद्रावर चंद्रयानाचं लँडिंग, जाणून घ्या
– मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’
– श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप – दैनिक मावळ श्रावण विशेष लेख