पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा आदर्श विद्यामंदिर तळेगाव येथे नुकतीच पार पडली. गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष 2024-25 मधील होणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेची तयाकी करून घेण्यासाठी आणि त्याचे नियोजन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विस्तार अधिकारी शोभा वहिले यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा आरंभ केला. ‘सर्व शिक्षकांना आतापासूनच मायक्रो प्लॅनिंग करून अध्यापन करावे. मूल कुठे आहे त्याचा शोध घेऊन काम करावे. जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावे,’ असे मार्गदर्शन शिक्षणाधिकारी यांनी केले. ( maval taluka level scholarship workshop for teachers concluded at talegaon dabhade )
पेपर 1 आणि पेपर 2 मधील इंग्रजी, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे अचूक व प्रभावी अध्यापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विषय व घटकनिहाय स्वतःचे अनुभव व प्रेरणा यावेळी मांडण्यात आल्या. निर्मला काळे, सुनंदा दहितुले, मंगल आहेर, आण्णासाहेब ओव्हाळ, अश्विनी पाटील, सरिता काळे , सुरेखा थोपटे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
मावळ तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, 98 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 116 प्रशिक्षणार्थी शिक्षक यावेळी उपस्थित होते. प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, मुख्याध्यापक संतोष खामकर यांनी देखील सर्वांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. ज्योती लावरे यांनी कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
अधिक वाचा –
– भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी, आमदार सुनिल शेळके यांची विधानसभेत मागणी, वाचा काय म्हणालेत आमदार…
– अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्यांचे वाटप । Dehu News
– निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान ठाकर बिनविरोध । Gram Panchayat Election