‘संकल्प दूरदृष्टीचा – सर्वांगीण विकासाचा’ ह्या टॅगलाईनखाली सध्या मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गावनिहाय संवाद दौरा सुरु आहे. या उपक्रमांतर्गत आंदर मावळातील भोयरे, कशाळ, किवळे, इंगळूण, पारीठेवाडी, कुणे, अनसुटे, माळेगाव खुर्द, पिंपरी, माळेगाव बुद्रुक, सावळा या गावातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संवाद साधला. ( Maval Taluka NCP Party Village Dialogue Tour )
मावळ तालुका हा आमदार सुनिल शेळके यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बनला आहे. 25 वर्षांची भाजपा-शिवसेनेची सत्ता उद्वस्त करत सुनिल शेळके यांनी मैदान मारले आणि बाळा भेगडे यांचा पराभव करत आमदार बनले. मागील चार वर्षांपासून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच बळावला आहे. आजमितीला अजितदादांच्या विश्वासू आमदारांचा बालेकिल्ला बनला आहे.
गावखेडे आणि स्थानिक पदाधिकारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद समजली जाते. आमदार सुनिल शेळके यांच्यामुळे मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात मागील चार वर्षांत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तयार झाले आहे. बापू भेगडे, गणेश खांडगे आदी नेत्यांनी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवली आहे. अशात आगामी निवडणूका राज्यातील राजकीय समीकरण पाहता तालुक्यात पक्षाची पाळेमुळे आणखीन भक्कम करणे, ह्यासाठी राष्ट्रवादीकडू ‘गावनिहाय संवाद दौरा’ आयोजित केल्याचे बोलले आहे.
“कार्यकर्त्यांची ताकद हेच पक्ष संघटनेचे बळ आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत विकासात्मक कामांचा आढावा घेतला. गावपातळीवरील विकास कामांच्या सूचना कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणाने मांडल्या.” अशी माहिती गणेश खांडगे यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कामशेत शहर महिला आघाडी अध्यक्षपदी ‘यांची’ निवड, इंदोरी इथे कलश पूजन आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम
– शिक्षकदिन, जागतिक शिक्षकदिन आणि गुरुपौर्णिमा – वाचा दैनिक मावळ विशेष लेख
– महाराष्ट्र सरकारच्या कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना : जाणून घ्या योजनेची माहिती आणि संपूर्ण प्रक्रिया
– पवना धरण फुल्ल, तरीही पिंपरी-चिंचवड शहराला होतोय दिवसाआड पाणीपुरवठा, ‘हे’ आहे कारण