मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघताना दिसत आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट) यांच्याकडून काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांवर नजर टाकल्यास तालुक्यातील दादा गटातील अनेक नेते आता साहेबांच्या गोटात आल्याचे दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत पुणे जिल्हा सरचिटणीस पदी “रमेश घोजगे”, मावळ विधानसभा मतदार संघ सहकार सेल अध्यक्षपदी “सुधाकर मारुती वाघमारे”, मावळ तालुका महिला अध्यक्ष पदी “जयश्रीताई पवार”, मावळ तालुका आध्यात्मिक व वारकरी आघाडी अध्यक्ष पदी “योगेश पांडुरंग चोपडे”, मावळ तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष पदी “अक्षय नारायण मुऱ्हे” यांची निवड करण्यात आली आहे. अतुल राऊत यांनी ही माहिती दिली. ( Maval taluka NCP Sharad Pawar group announced appointment of new office bearers )
तर, मावळ तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी “नवनाथ ज्ञानेश्वर केदारी”, उपाध्यक्ष पदी “सोपान नथू गोंटे” यांना नियुक्ती पत्र खासदार अमोल कोल्हे, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले यांच्या हस्ते देण्यात आले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम माजी मंत्री मदन बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करण्याचा मनोदय सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केला. यावेळी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष आदिनाथ मालपोटे, सुधाकर वाघमारे,शंकर मोढवे, योगेश करवंदे,पंकज भामरे, जितेंद्र कालेकर,नरेंद्र मुऱ्हे,सिद्धेश मुऱ्हे ,आकाश जगदाळे,प्रतीक मुऱ्हे,आकाश साळुंखे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन वचन दिलंय, त्यावर ठाम आहे…’, पाहा मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
– हुक्का विक्री करणाऱ्या दोघांवर तर उशिरापर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या 6 जणांवर लोणावळा पोलिसांची कारवाई!
– इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला तत्काळ मान्यता देण्याची मागणी