व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हुक्का विक्री करणाऱ्या दोघांवर तर उशिरापर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या 6 जणांवर लोणावळा पोलिसांची कारवाई!

लायन्स पॉईंटवर हुक्का विक्री करणाऱ्या दोघांवर, तर रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवणाऱ्या 6 जणांवर आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तीन पर्यटकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रविवारी मध्यरात्री कारवाई केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 19, 2023
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


लायन्स पॉईंटवर हुक्का विक्री करणाऱ्या दोघांवर, तर रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवणाऱ्या 6 जणांवर आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तीन पर्यटकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रविवारी मध्यरात्री कारवाई केली. पोलीस शिपाई रईस नजीर मुलाणी (लोणावळा शहर पोलीस) यांनी या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संतोष शंकर आखाडे (वय 27 वर्षे, रा. भुशी – लोणावळा) आणि 2) दिपक भागु हिरवे (वय 27 वर्षे, रा. देवघर, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रविवार (दिनांक 17 डिसेंबर 2023) रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलिसांनी मौजे आतवण गावच्या हददीत टाईगर पाईंट इथे संबंधित मालकाच्या दुकानामध्ये कारवाई केली. यावेळी दोन टेबलवर हुक्का पिण्यासाठी असणारा पॉट व पाईप असे सात पॉट मिळून आले. तसेच सदर दुकानामधील एका कोपऱ्यातील खोलीमध्ये हुक्का पार्लरसाठी लागणारे पदार्थ आणि हुका पिण्यासाठी लागणारे साहित्य मिळुन आले. ( lonavala gramin police action against shopkeeper who sell hookah at tiger point )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी व सार्वजनिकरित्या मानवी जिवितास धोका व शासनाने बंदी घातलेले साहित्य कब्जात बाळगल्याने मिळून आल्याने त्यांच्या विरूध्द सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य व उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय) अधिनियम 2003 चे सुधारीत अधिनियम 2018 चे कलम 4(अ) व 21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरिक्षक धुमाळ यांच्या आदेशान्वये पोलिस हवालदार पवार करीत आहेत.

तसेच, टायगर पॉइंट इथे उशिरापर्यंत दुकाने सुरू असल्याबाबत 6 जणांवर 33(w) प्रमाणे कारवाई करण्यात आली. तर, रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या 3 पर्यटकांवर देखील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/112 अन्वये कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, सहा पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली API सचिन राऊळ, PSI शुभम चव्हाण, PSI भारत भोसले, पोहवा सागर बनसोडे, अंकुश नायकुडे, नितेश कवडे, सचिन गायकवाड, पोना दत्ता शिंदे, पोकॉ रहीस मुलाणी, सुभाष शिंदे, सिद्धेश वाघमारे यांच्या पथकाने केली.

अधिक वाचा –
– ‘मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांना पायी दिंडीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करावी’, शिवसेना ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदन
– श्रीराम मंदिर अक्षता कलश यात्रेचे वडगाव मावळमध्ये उत्साहात स्वागत
– आढे गावच्या सरपंच सुनीता सुतार यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार


dainik maval jahirat

Previous Post

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला तत्काळ मान्यता देण्याची मागणी

Next Post

‘छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन वचन दिलंय, त्यावर ठाम आहे…’, पाहा मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde-Twitter-Video

'छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन वचन दिलंय, त्यावर ठाम आहे...', पाहा मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.