मागील महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्याने मराठा समाज अधिक आक्रमक झाला आहे. स्वतः मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे राज्यभरात गावागावात मराठा समाज आक्रमक होत असून अनेक ठिकाण गावच्या गावे एकत्र येऊन राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करणे, मोर्चा काढणे आदी मार्गांनी आंदोलने करत आहेत. मावळ तालुक्यात सर्वात आधी कातवी या गावात मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील अन्य गावातही याची घग पोहोचली आहे.
मावळ तालुक्यातील कशाळ गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या संदर्भात नायब तहसीलदार आणि वडगाव पोलीस स्टेशन यांना ग्रामस्थांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तसं निर्णय होत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ नये. जर कोणी आरक्षणाच्या निर्णयाच्या शिवाय गावात प्रवेश केला, तर घडणाऱ्या प्रकाराची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दिवाळीनिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा
– निकिता वानखेडे ठरल्या भाग्यशाली महादुर्गा – 2023 च्या विजेत्या, बक्षिसांचा झाला पाऊस । Vadgaon Maval