मावळ तालुक्यात आठवड्याच्या सुरूवातीला एक संतापजनक घटना समोर आली होती. वराळे (ता. मावळ) येथे राहणाऱ्या (भाडेतत्वावर) एक महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर तिच्या प्रियकराने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीपात्रात टाकत असताना रडणाऱ्या तिच्या दोन जिवंत मुलांनाही नदीत ढकलले होते. या घटनेनंतर तालुक्यात मृत मुलांबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. तर महिलेसह तिच्या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. दरम्यान घटनेतील मृत महिलेच्या नातेवाईकांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मृत विवाहित महिलेचे माहेर हे अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील आहे. त्यामुळे स्थानिक नेते, तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या समवेत मृताच्या वारसदारांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि न्यायासाठी त्यांना साकडे घातले. विवाहित प्रेयसीचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह इंद्रायणी नदीत टाकताना रडणाऱ्या दोन्ही मुलांनाही आरोपींनी नदीत फेकून दिले होते. या गंभीर घटनेची शासनाने तत्काळ दखल घेऊन आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच मृतांच्या वारसदारांना 50 लाख रुपये मदत मिळावी, अशी मागणी मृत विवाहितेच्या माहेर आणि सासरच्या मंडळींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मृत महिलेचे माहेर अक्कलकोट येथील असल्याने माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या समवेत मृताच्या वारसदारांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर मृतांच्या वारसदारांनी आक्रोश करित आपली व्यथा मांडली. शिष्टमंडळात अक्कलकोट येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशपाक बळोरगी व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचाही समावेश होता.
दरम्यान या घटनेतील दोन आरोपी अटकेत आहेत. तर अन्य काही आरोपींनी देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस या प्रकरणाचा तपास करित आहेत. ( Maval Taluka Triple Massacre relatives of deceased woman met CM Eknath Shinde )
अधिक वाचा –
– सासूने आपल्यावर तंत्र-मंत्र केल्याचा सुनेचा आरोप, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल । Talegaon Dabhade
– मोठी बातमी ! मावळमधील ग्रामीण भागातील ‘या’ 10 ठिकाणच्या रस्ते विकासकामांना प्रशासकीय मान्यता, पाहा यादी । Maval News
– तळेगाव दाभाडे शहर भाजपाच्या अध्यक्षपदी पुन्हा ‘दाभाडे’च । Talegaon Dabhade