व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वारसांना 50 लाख मिळावेत ; तिहेरी हत्याकांडातील मृत महिलेच्या वारसांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

मावळ तालुक्यात आठवड्याच्या सुरूवातीला एक संतापजनक घटना समोर आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 27, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval Taluka Triple Massacre

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात आठवड्याच्या सुरूवातीला एक संतापजनक घटना समोर आली होती. वराळे (ता. मावळ) येथे राहणाऱ्या (भाडेतत्वावर) एक महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर तिच्या प्रियकराने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीपात्रात टाकत असताना रडणाऱ्या तिच्या दोन जिवंत मुलांनाही नदीत ढकलले होते. या घटनेनंतर तालुक्यात मृत मुलांबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. तर महिलेसह तिच्या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. दरम्यान घटनेतील मृत महिलेच्या नातेवाईकांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

Novel NIBR Ads

मृत विवाहित महिलेचे माहेर हे अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील आहे. त्यामुळे स्थानिक नेते, तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या समवेत मृताच्या वारसदारांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि न्यायासाठी त्यांना साकडे घातले. विवाहित प्रेयसीचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह इंद्रायणी नदीत टाकताना रडणाऱ्या दोन्ही मुलांनाही आरोपींनी नदीत फेकून दिले होते. या गंभीर घटनेची शासनाने तत्काळ दखल घेऊन आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच मृतांच्या वारसदारांना 50 लाख रुपये मदत मिळावी, अशी मागणी मृत विवाहितेच्या माहेर आणि सासरच्या मंडळींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मृत महिलेचे माहेर अक्कलकोट येथील असल्याने माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या समवेत मृताच्या वारसदारांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर मृतांच्या वारसदारांनी आक्रोश करित आपली व्यथा मांडली. शिष्टमंडळात अक्कलकोट येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशपाक बळोरगी व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचाही समावेश होता.

दरम्यान या घटनेतील दोन आरोपी अटकेत आहेत. तर अन्य काही आरोपींनी देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस या प्रकरणाचा तपास करित आहेत. ( Maval Taluka Triple Massacre relatives of deceased woman met CM Eknath Shinde )

अधिक वाचा –
– सासूने आपल्यावर तंत्र-मंत्र केल्याचा सुनेचा आरोप, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल । Talegaon Dabhade
– मोठी बातमी ! मावळमधील ग्रामीण भागातील ‘या’ 10 ठिकाणच्या रस्ते विकासकामांना प्रशासकीय मान्यता, पाहा यादी । Maval News
– तळेगाव दाभाडे शहर भाजपाच्या अध्यक्षपदी पुन्हा ‘दाभाडे’च । Talegaon Dabhade

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

कार्ला – मळवली दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद, वेहेरगांव मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी । Pune News

Next Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद ; महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला उदंड प्रतिसाद ; महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
crime-arrested

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

June 19, 2026
maharashtra-police

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 19, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

June 19, 2026
mp-shrirang-barne

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

June 19, 2026
Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.