Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुनिल शेळके हे दुसऱ्यांदा आमदारकीच्या रिंगणात उभे आहेत. सुनिल शेळके यांचे संपूर्ण नाव सुनिल शंकरराव शेळके असे असून ते तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथील रहिवासी आहेत. तळेगाव दाभाडे आणि मावळ तालुका हीच सुनिल शेळके यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे.
कौटुंबिक माहिती –
सुनिल शेळके यांचे वडील शंकरराव शेळके हे समाजकारणात जोडून आहेत. तर त्यांच्या आई या गृहिणी आहेत. सुनिल शेळके यांच्या सहचारिणी सारिका शेळके या घर – संसार संभाळून सुनिल शेळके यांना राजकीय वाटचालीत मदत करीत आहेत. तर सुनिल शेळके यांना दोन अपत्ये असून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तसेच त्यांना भाऊ, चुलते आणि संपूर्ण मोठा परिवार आहे.
सुनिल शेळके यांचे शिक्षण –
सुनिल शेळके यांचे शिक्षण फक्त दहावी इयत्ते पर्यंत झाले आहे. ते तळेगावमधील परांजपे विद्यालयात शिकले आहेत. सुनिल शेळके यांनी आपल्याला पुढे शिकायचे होते, कॉलेजमध्ये जायते होते, परंतु ते स्वप्नच राहिले असल्याचे आजवर अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे.
राजकीय कारकीर्द –
शेळके कुटुंब हे पूर्वीपासून संघ परिवाराशी जोडलेले आहे. सुनिल शेळके यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले. त्यापूर्वी 2019 पूर्वी सुनिल शेळके हे भारतीय जनता पार्टी पक्षातील कार्यकर्ते होते. भाजपातूनच ते लहानाचे मोठे झाले. तसेच त्यांच्या चार पिढ्या राजकारणात भाजपाच्या माध्यमातूनच समोर आल्या आहेत.
सुनिल शेळके यांची चढती राजकीय कारकीर्द –
– 2004 पासून भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून कार्यरत
– 2011 तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत विक्रमी मतांनी नगरसेवक म्हणून निवड
– 2016 तळेगाव दाभाडे नगर परिषदेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड
– 2019 निवडणुकीत 93 हजार मताधिक्यांनी विजयी
– 2024 महायुतीचे उमेदवार म्हणून मावळ विधानसभेच्या रिंगणात
सुनिल शेळके यांनी केलेली कामे –
अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले सुनिल शेळके यांनी मागील पाच वर्षांत जवळपास 4 हजार कोटीचा निधी मावळ तालुक्यासाठी आणला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते, वीजेच्या समस्या त्यांनी मार्गी लावल्या आहेत. तसेच मावळ तालुक्यात दोन उपजिल्हा रुग्णालये उभारून तालुक्यातील आरोग्य समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तहसील कार्यालय, नगर परिषद इमारत आदी प्रश्न मार्गी लावले आहेत. लोणावळ्यात पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा असणारा ग्लास स्कायवॉक सारखा मोठा प्रकल्प त्यांनी तालुक्यात आणला आहे.
“महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मावळच्या मायबाप जनतेच्या पाठबळाने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मावळात चार हजार कोटींची कामे आणि शाश्वत विकास हाच अजेंडा घेऊन मतदारांसमोर जात आहे. मायबाप मतदार मला पुन्हा एकदा मावळची सेवा करण्याची संधी देतील, हा मला विश्वास आहे.” – सुनिल शेळके, उमेदवार, मावळ विधानसभा
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा
– मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश