Dainik Maval News : मावळ पॅटर्नमुळे मावळ विधानसभा मतदारसंघाची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. महायुतीचा अधिकृत उमेदवार आणि त्याच्या विरोधात महायुतीतला बंडखोर उमेदवार, ज्याला महाविकासआघाडीसह भाजपाच्या बंडखोर व दिग्गज नेत्यांचा पाठींबा अशी ही रंगतदार आणि आगळीवेगळी लढत झाली.
सुनील शेळके आणि बापूसाहेब भेगडे यांच्यातील ही तुल्यबळ लढत संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. यात कमी म्हणून की काय संपूर्ण मतदारसंघात एकाही पक्षाच्या दिग्गज नेत्याची सभा झाली नाही. एकूणच काय ही निवडणूक पुरेपुर मावळी राजकारणाची निवडणूक झाली. यामुळेच आता निवडणुकीचा निकाल काय लागणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशात मावळ विधानसभेत कुणाचं पारडं जड आहे, याचीही चर्चा होत आहे.
जवळपास चार हजार कोटींची विकासकामे हा आकडा दाखवित आणि मतदारांना अनेक मोठमोठी स्वप्न दाखवून आमदार शेळके मैदानात झुंजत होते. तर दुसरीकडे अकल्पनीय अशी सर्वच विरोधकांची मोट बांधून पुढाऱ्यांची भली मोठी फौज घेऊन बापूसाहेब भेगडे यांनी टक्कर दिली. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात या दोन्ही पैलवानांची ही कुस्ती अतिशय तुल्यबळ अशीच झालीये. परंतु आता नेमका निकाल काय लागणार याविषयी अनेक मतमतांतरे आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात 72 टक्के मतदान, महिला वर्गाचे विक्रमी मतदान : कोण बाजी मारणार ? । Maval Vidhan Sabha
– द्रुतगती मार्गावर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळात यंदा विक्रमी मतदान, मागील तीन निवडणुकांचा इतिहास काय सांगतो? वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? । Maval Vidhan Sabha