Dainik Maval News : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (दि. 23) होणार आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रांगणात होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असल्यामुळे त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी देखील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोठे वाहने पार्क करावीत, याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत काल (गुरुवारी) सुधारीत आदेश जारी केला आहे.
महायुतीच्या कार्यकर्त्यांना येथे पार्किंग
मतमोजणीच्या दिवशी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यांसाठी तळेगाव स्टेशन चौकातून हरणेश्वर सोसायटी मार्गे येवून वाघळे पार्क, हरणेश्वर सोसायटी, येथील अंतर्गत रोड लगत तसेच भारत पेट्रोल पंप ते ईगल कार्नर पर्यंत सर्व्हिस रोडवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यकर्त्यांना थांबण्याकरीता नूतन पॉलेटेक्निक कॉलेजच्या कमानीच्या उजव्या बाजूला 200 मीटर अंतरावर व्यवस्था करण्यात आली आहे.
बापूसाहेब भेगडे यांच्या कार्यकर्त्यांसाठी येथे पार्किंग
मतमोजणीच्या दिवशी अपक्ष उमेदवार बापूसाहेब जयवंतराव भेगडे यांच्या कार्यकर्त्यांसाठी वडगाव फाटा ते स्वराज नगरी मार्गे येवून माउंट सेंट ॲन स्कूल तळेगाव चाकण रोड तळेगाव या शाळेच्या पार्किंगमध्ये थांबण्याची व मैदानामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर अपक्ष उमेदवारांसाठी येथे पार्किंग
इतर अपक्ष उमेदवार यांच्या कार्यकर्त्याकरीता दुय्यम निबंधक कार्यालया समोरील अंतर्गत रोड लगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालया जवळील मोकळ्या जागेत व्यवस्था करण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात 72 टक्के मतदान, महिला वर्गाचे विक्रमी मतदान : कोण बाजी मारणार ? । Maval Vidhan Sabha
– द्रुतगती मार्गावर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळात यंदा विक्रमी मतदान, मागील तीन निवडणुकांचा इतिहास काय सांगतो? वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? । Maval Vidhan Sabha