व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

यापुढे चुकीला माफी नाही; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हद्दीतील खासगी बंगला चालक-मालक यांना नियमांची तंबी

सोमवारी (दिनांक 19 डिसेंबर) रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत ही बैठक घेण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 20, 2022
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Lonavla-Gramin-Police

Photo : Nitesh Kavade


लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खासगी बंगले भाड्याने देणारे बंगला मालक/चालक/केअर टेकर यांची बैठक लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली. सोमवारी (दिनांक 19 डिसेंबर) रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत ही बैठक घेण्यात आली. ( Meeting Of Private Bungalow Driver Owner Care Taker In Lonavala Rural Police Station Under Guidance Of ASP Satya Sai Karthik )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर बैठकीमध्ये खासगी बंगल्यात असलेल्या स्विमिंग पूलचे सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून स्विमिंग पूलला तारेचे कुंपण करणे, लहान मुलांना सहजासहजी प्रवेश करता येणार नाही, अशा उपाययोजना करणे, लाईफ गार्ड सुरक्षा गार्ड नेमणे, स्विमिंग पूलला कायदेशीर परवाना घेतलेला असावा, खासगी बंगल्यात एमटीडीसी परवाना असणे बंधनकारक आहे. गेस्टचे संपूर्ण डिटेल्स आणि ओळखपत्र घेणे त्याचे नोंद रजिस्टरमध्ये करणे बंधनकारक आहे, तसेच येणाऱ्या ग्राहकांना नियमावली वाचून दाखवून त्याचे पालन करण्याचे हमीपत्र भरून घ्यावे. स्पीकर परवाना घेऊन आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, शेजारील नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)

बंगल्याचे प्रवेशद्वारावर, आतबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे अध्यायावत करणे, केअर टेकरची नेमणूक करून महिला आणि मुलींचे सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, व्यवसाय करताना इतर संबंधित सर्व विभागाचे कायदेशीर परवाना घेणे, एखादा व्यक्ती संशयित वाटल्यास पोलिसांना कळवणे. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरला होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याच्यासाठी योग्य ती कारवाई खबरदारी घेणे. यापुढे स्विमिंग पूलमध्ये पडून मयl झाल्याच्या घटना घडल्यास आणि बंगल्यामध्ये अवैध घटना करताना आढळून आल्यात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

सदर बैठकीला लोणावळा विभागाचे सहाय्य पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, पोलीस हवालदार नितेश कवडे, जय पवार, सिताराम बोकड, पोलीस नाईक दत्ता शिंदे, गवारी, पोलीस कॉन्स्टेबल सागर धनवे, सुभाष शिंदे, होमगार्ड मराठे, शिर्के यांच्यासह 100 ते 125 बंगले चालक-मालक केअरटेकर उपस्थित होते.

अधिक वाचा –

– चांदखेड आणि परंदवडी ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच घरोघरी येणार जलगंगा, महिलांची पायपीट थांबणार
– मोरवे गावात शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम; हॅण्ड इन हॅण्ड संस्थेचा स्तुत्य उपक्रम
– लोकप्रतिनिधी असावा तर असा; अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन राष्ट्रवादीच्या महिला आमदार अधिवेशनाला हजर – व्हिडिओ


Previous Post

चांदखेड आणि परंदवडी ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच घरोघरी येणार जलगंगा, महिलांची पायपीट थांबणार

Next Post

युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज : प्रत्येक भारतीयाच्या आरोग्यसेवेच्या खात्रीसाठी सर्वसमावेशक आरोग्य विमा संरक्षणाची गरज

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Universal-Health-Coverage

युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज : प्रत्येक भारतीयाच्या आरोग्यसेवेच्या खात्रीसाठी सर्वसमावेशक आरोग्य विमा संरक्षणाची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.