व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज : प्रत्येक भारतीयाच्या आरोग्यसेवेच्या खात्रीसाठी सर्वसमावेशक आरोग्य विमा संरक्षणाची गरज

मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसून सिकदार

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 20, 2022
in देश-विदेश, महाराष्ट्र
Universal-Health-Coverage

File Image


जीवनातील स्वप्ने साकारताना उत्तम आरोग्य, आर्थिक स्वास्थ्य व आनंदाला प्राधान्य दिले जाते. सर्व देशांमधील प्रमुख व अधिकारी एकत्रित पुढाकार घेऊन विद्यमान आरोग्यसेवा सिस्टमला सुधारित करण्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत, ज्यामुळे एकूण आरोग्य व स्वास्थ्याला चालना मिळाली आहे. महामारीने जगातील सार्वजनिक आरोग्यसेवा सिस्टमला प्रकाशझोतात आणले आहे. व्यक्तीची आर्थिक ध्येये निश्चित करण्यासाठी आणि सर्वांचे आरोग्य व स्वास्थ्याला चालना देण्यासोबत सर्वोत्तम आरोग्यसेवा संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजची गरज आहे. एकूण युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजच्या पद्धतीमध्ये बदल म्हणजे सर्वोत्तम विश्व आणि आरोग्यदायी समाज. ( Relevance Of Universal Health Coverage And Its Importance )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज : काळाची गरज

आरोग्यसेवेचे युनिव्हर्सल कव्हरेज म्हणजे प्रत्येकाला गरजेच्या वेळी दर्जात्मक आरोग्यसेवा उपलब्ध असतील आणि त्यासाठी त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

कदाचित युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज आणि उत्तम आरोग्यसेवा योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दीर्घायुष्य. उत्तम आरोग्यसेवा योजना आणि आरोग्य कव्हरेजचा जीवनाच्या दर्जावर मोठा प्रभाव पडतो यात शंका नाही. व्यक्तीला उत्तम आरोग्यसेवा मिळतात, तेव्हा ते पुरेशा उपचारांच्या मदतीने आजारांवर मात करण्याची अधिक शक्यता असते. तसेच सहाय्यक ठरणारी प्रतिबंधात्मक काळजी आरोग्यसेवा प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

युनिव्हर्सल हेल्थकेअर हे ध्येय असण्यासह जवळपास 14 टक्क्यांपर्यंत उच्च वैद्यकीय खर्च आणि वैद्यकीय आपत्तीदरम्यान खिशाला न परवडणारा होणारा खर्च पाहता सर्वसमावेशक आरोग्य विमा योजनेचा अवलंब केल्यास व्यक्तीच्या आर्थिक गरजांची पूर्तता होण्याची, तसेच दर्जात्मक आरोग्यसेवा मिळण्याची खात्री मिळू शकते.

दैनिक मावळला फेसबूकवर फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा

सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना युनिव्हर्सल हेल्थकेअर देण्यामध्ये कशाप्रकारे मदत करू शकते?

आरोग्यसेवेची उपलब्धता, अधिकाधिक सुविधा स्थापित करणे आणि जागरूकतेचा प्रसार सर्व महत्त्वाचे असले तरी आरोग्यदायी विश्वासाठी प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे सर्वांगीण आरोग्य विमा योजना. वैद्यकीय व हॉस्पिटलायझेशन खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि हे विविध घटकांवर अवलंबून आहे. रूग्णासाठी सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे खिशाला न परवडणारा खर्च. व्यक्तीने आरोग्य विमा योजना घेतली असताना देखील त्या योजनेमधून हॉस्पिटलमधील व बाहेरील खर्चासाठी, तसेच आऊट-ऑफ- हॉस्पिटल खर्च जसे नॉन-मेडिकल इक्विपमेंट, फार्मसी व ओपीडी शुल्कांमधून निर्माण होणाऱ्या मोठ्या बिलासाठी पुरेसे आर्थिक संरक्षण मिळत नाही. म्हणून पुरेशी आरोग्य विमा पॉलिसी व विमाकृत राशी असण्याची खात्री घेतली पाहिजे. आज आपण विचार करतो त्यापेक्षाही सर्वसमावेशक आरोगय विमा अधिक महत्त्वाचा आहे. ही एक गरज बनली आहे, ज्याबाबत कोणीच तडजोड करू शकत नाही.

कुटुंबं व समाजांना उत्तम आरोग्य विमा योजनेचे पाठबळ मिळते तेव्हा त्यांच्या आर्थिक व आरोग्यविषयक गरजांचे संरक्षण होते. आरोग्य विमा व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाचा भाग असला पाहिजे, कारण आरोग्य विमा पॉलिसी व्यक्तीच्या आर्थिक गरजांचे संरक्षण देखील करू शकते; तसेच व्यक्ती अपघात किंवा आजारामुळे पुन्हा कामावर जाऊ न शकत नसेल तर पर्सनल अॅक्सिडण्ट कव्हर सारखी आरोग्य विमा योजना त्यांना एकरकमी लाभ देऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीचे संरक्षण होण्यासोबत ते जीवनातील चढ-उतारांसाठी नेहमी सुसज्ज असण्याची खात्री मिळते. अशा प्रकारे ते आर्थिक संकटाचा सामना न करता त्यांच्या अपघातातून बरे होऊ शकतात.

तंत्रज्ञान प्रक्रियेला कशाप्रकारे चालना देऊ शकते

विमा उद्योगाशी तंत्रज्ञान व डिजिटायझेशन नेहमीच संलग्न आहे. तंत्रज्ञान सुधारणा जसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशिन लर्निंग (एमएल) आणि ब्लॉकचेन यांनी ग्राहक ऑनबोर्डिंग व सर्विसिंगमध्ये धुमाकूळ निर्माण करण्याची मोठी संधी दिली आहे, ज्यामधून अधिक वैयक्तिकृत आणि सुलभ खरेदी व सेवा अनुभव मिळतो. आरोग्य विमा कंपन्या देखील क्लेम्स सेटल करण्यापलीकडे इकोसिस्टम निर्माण करत आहेत. या कंपन्यांनी हॉस्पिटल्ससोबत सहयोग केला आहे, व्यापक नेटवर्क्स निर्माण केले आहेत आणि नागरिकांना स्थानिक व जागतिक कव्हरेज दिले आहेत. तंत्रज्ञानाने प्रक्रियेमध्ये एकप्रवाह आणण्यास मदत केली आहे, ज्यामधून खात्री मिळते की ग्राहक उपलब्ध असलेल्या सेवांबाबत जागरूक आहेत आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या आरोग्य विमा पॉलिसीबाबत माहित आहे. या सर्व सुविधांनी ग्राहक प्रवास सुलभ केला आहे आणि ग्राहक त्यांच्यासाठी उपलब्ध सेवांचा पूर्णपणे वापर करत असल्याची खात्री मिळते. अलिकडील काळात तंत्रज्ञानाने उद्योगाला देशातील काही सेवा उपलब्ध न झालेल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास देखील मदत केली आहे.

सारांश

भारत सर्वांसाठी युनिव्हर्सल आरोग्यसेवा देण्याप्रती कटिबद्ध आहे आणि यामध्ये आरोग्य विमा उद्योगाची मोठी भूमिका आहे. २०४७ पर्यंत सर्वांना आरोग्य विमा देण्यासाठी विमा नियामक आयआरडीएआयकडून देखील बरेच प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांसह सर्वांसाठी युनिव्हर्सल आरोग्यसेवेचे स्वप्न लवकरच साकारले जाऊ शकते.

अधिक वाचा –

– चांदखेड आणि परंदवडी ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच घरोघरी येणार जलगंगा, महिलांची पायपीट थांबणार
– मोरवे गावात शासकीय सामाजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम; हॅण्ड इन हॅण्ड संस्थेचा स्तुत्य उपक्रम


dainik maval jahirat

Previous Post

यापुढे चुकीला माफी नाही; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हद्दीतील खासगी बंगला चालक-मालक यांना नियमांची तंबी

Next Post

मावळात चंद्रकांत पाटलांनी प्रचार केला त्याच गावात भाजपचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Nigade-Grampanchayat

मावळात चंद्रकांत पाटलांनी प्रचार केला त्याच गावात भाजपचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.