व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 4, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha

पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका करण्यासंदर्भात लवकरच राज्य सरकार सोबत बैठक घेतली जाईल.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 20, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Meeting to resolve pending railway issues in Maval constituency Union Railway Minister assures

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका करण्यासंदर्भात लवकरच राज्य सरकार सोबत बैठक घेतली जाईल. लोणावळावरून पुण्याला जाणारी दुपारी दीड वाजताची लोकल पुन्हा सुरू करण्याबाबत जनरल मॅनेजरला निर्देश दिले जातील. अमृत भारत योजनेत कर्जत रेल्वे स्थानकाचा समावेश केला जाईल. मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आठ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

tata tiago ads may 2025

  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे विभागाच्या चर्चेत खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार बारणे यांना दालनात भेटण्यासाठी बोलविले. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न समजावून घेतले. या प्रश्नांबाबत अधिवेशना दरम्यान अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीची माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. ही मार्गिका करण्याबाबत राज्य सरकार सोबत बैठक घेण्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा केली. ही मार्गिका झाल्यास प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. पनवेल येथे रेल्वेचे जंक्शन होत आहे. या जंक्शनला आताच मेट्रो जोडावी. जेणेकरून नागरिकांना मोठा फायदा होईल. कर्जतपासून लोणावळा पर्यंत नवीन मार्गिका तयार करावी. घाट परिसर कमी करावा.

मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, लोणावळा, तळेगाव दाभाडे, पनवेल, नेरळ रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत कायापालट होत आहे. या योजनेत कर्जत रेल्वे स्थानकाचा समावेश करावा. त्याचा डीपीआर तयार करावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्यावर पुढील वर्षी कर्जतचा समावेश केला जाईल अशी ग्वाही मंत्री वैष्णव यांनी दिली. ओव्हर ब्रिज च्या कामाला गती द्यावी. सिडकोने बनविलेल्या रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव आहे. रेल्वे विभागाने सिडकोशी चर्चा करून सुविधा निर्माण कराव्यात, अशा विविध मागण्या केल्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अधिवेशना दरम्यान अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री वैष्णव यांनी दिले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई


dainik maval ads may 2025

Previous Post

बालपण समृद्ध करणारी, चिऊताई…! तुझ्यासाठी दोन ओळी । World Sparrow Day

Next Post

देहू गावात पिस्तूल, कोयता बाळगणाऱ्या तरूणाला अटक ; दोन अल्पवयीन ताब्यात । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

देहू गावात पिस्तूल, कोयता बाळगणाऱ्या तरूणाला अटक ; दोन अल्पवयीन ताब्यात । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZENITH Waterfall Khopoli

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध ‘झेनिथ वॉटरफॉल’ येथे दुर्घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी विविध उपाययोजना । ZENITH Waterfall Khopoli

June 4, 2025
Abandoned vehicles Vadgaon Maval Police Station

पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’कडून वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन । Pimri Chinchwad RTO

June 4, 2025
empowerment of women and girls

महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय!

June 4, 2025
PMRDA

‘पीएमआरडीए’कडून पुणे जिल्ह्यातील १५० प्रस्तावित रस्त्यांसाठी भूसंपादन सुरू ; मावळ, मुळशी, हवेली, शिरूर तालुक्यातील रस्त्यांचा समावेश

June 4, 2025
Sant Tukaram Maharaj Ashadhi foot procession palanquin ceremony

संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा : पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा ; देहू संस्थानची मागणी

June 4, 2025
Accident

भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू, नवलाख उंबरे येथील घटना । Maval News

June 3, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.