देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त वीर हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान देशभर राबवण्यात येत आहे. इंदोरी इथे भारतीय जनता पार्टीची मासिक बैठक सोमवारी (दिनांक 4 सप्टेंबर) पार पडली. ह्या बैठकीनंतर ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत इंदोरी इथे कलश पूजन करून पंचप्राण शपथ घेतली गेली.
भाजपाच्या मासिक आढावा बैठकीत इंदोरी येथील सर्व बूथ वरील मतदार याद्यांचे वाचन करून बुथ स्तरावरील सर्व रचना पूर्ण करून घेण्यात आली. तसेच कामशेत शहर महिला आघाडी अध्यक्षपदी सुरेखताई बच्चे यांची निवड करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ( Meri Mati Mera Desh Abhiyan Kalash Pujan and Panchprana Oath Program at Indori Maval )
यावेली माजी सभापती धोंडिबा (नाना) मराठे, शिवाजी पवार, दशरथ ढोरे, शांताराम कदम, दत्तात्रय ढोरे, साईनाथ बानेकर, मधुकर ढोरे, शंकर शिंदे, सुनील चव्हाण, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, अभिमन्यू शिंदे, सुवर्णा कुंभार, ज्योती शिंदे, कल्यानी ठाकर, इंदोरी शहर अध्यक्ष जगन्नाथ शेवकर, आंदर मावळ अध्यक्ष गणेश कल्हाटकर, रामदासभाऊ गाडे, सुभाष धामणकर, राजेंद्र सातकर, सुदाम शेवकर, मनोहर भेगडे, संदीप नाटक, प्रविण शिंदे, संजय भेगडे, ह.भ.प संतोष महाराज शेलार, संतोष काळे, नंदकुमार ढोरे, रोहन जगताप, ऋतुराज काशीद, नीलम पानसरे, सीमा आहेर, वैदही रणदिवे, सारिका शिंदे, अनिता गवई, जया कुटेकर यांच्यासह इंदोरी गावातील व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
– मराठा समाजाचा निर्णय घेता येत नसेल तर सत्तेत तरी कशाला बसता?
– ‘पवना धरणातील पाणी पाहिजे पण पवना नदी नको, असं का?’, पवनमावळची जीवनदायिनी पुढे बनतेय मैलावाहिनी