पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त वीर हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान देशभर राबवण्यात आले. या अभियानांतर्गत गोडुंब्रे इथे 75 वृक्षांची लागवड करण्यात आली आणि पंचप्रण शपथ घेतली गेली. मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष तथा विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे ह्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी साळुंब्रे सोसायटी चेअरमन सतीश राक्षे, जेष्ठ संचालक संतोष राक्षे, गोडुंब्रे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक अल्हाट सर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शाळेतील विद्यार्थी आणि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ( meri mati mera desh plantation of 75 trees in godumbre village )
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक 9 ऑगस्टपासून सुरु झाला. ज्यात सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले गेले. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– नागरिकांनो, डोळ्यांची काळजी घ्या! डोळे येण्याच्या आजारापासून बचावासाठी वडगावात तब्बल 3000 आय ड्रॉपचे वाटप
– रेल्वे सुरक्षा बलाकडून व्हिपीएस विद्यालयात रेल्वे सुरक्षेचे धडे । Lonavala News
– दैनिक मावळ बुलेटीन : ‘पुणे मेट्रोचे स्टिअरिंग मावळ कन्येच्या हाती’ । ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांवरील कारवाईला स्थगिती