व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! इंदोरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

रविंद्र भेगडेंच्या मागणीला मोठं यश, मंत्री रवींद्र चव्हाणांचे रस्ते विकास सचिवांना इंदोरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 31, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Indori-Kundmala

File Image


मावळ तालुक्यातील मौजे इंदोरी कुंडमळा या गावातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीवरील असणारा साकव पूल हा दळणवळणाच्या दृष्टीने अडचणींचा ठरत आहे. आसपासच्या गावातील नागरिकांना या पुलावरुन शेतीमालाची तसेच दुग्ध पदार्थांची वाहतुक करावी लागते. परंतु हा साकव पूल असल्याने यावरून फक्त पायी चालणारे, आणि मोटारसायकलला जाता येते. सध्या अस्तित्वात असलेला साकव पूल 30 वर्षांपूर्वी स्व. खासदार अण्णा जोशी यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आला होता. शेजारील 10 ते 12 गावांच्या वाहतुकीचा हाच प्रमुख मार्ग आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीसाठी येथील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर कामगारवर्ग, नोकरदारवर्ग आणि विद्यार्थी- विद्यार्थीनींना या अडचणीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे प्रसिद्ध कुंडदेवी मातेचे मंदिर आहे त्यामुळे नेहमीच या मार्गावर भाविकांची वर्दळ असते.

तसेच या पुलाचे काम झाल्याने तळेगाव – चाकण रस्त्यावरील तळेगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे त्यामुळे येथे नवीन पूल उभारण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. याच संदर्भात,भारतीय जनता पक्षाचे मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रस्ते विकास सचिवांना प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्याने लवकरच नवीन पुलाचे काम मार्गी लागेल असा विश्वास भेगडेंनी व्यक्त केला. ( Minister Ravindra Chavan orders to submit proposal for bridge over Indrayani River at Indori Kundmala )

तसेच आमदार सुनिल शेळके यांनी देखील हा विषय हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडला होता.

अधिक वाचा –

– ‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ
– पवना धरणग्रस्तांना न्याय मिळणार कधी? 57 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, आमदार शेळकेंनी अधिवेशन गाजवलं
– वेदांता-फॉक्सकॉन मुद्द्यावर आमदार सुनिल शेळके विधानसभेत आक्रमक, भरपाई कशी करणार? सरकारला सवाल


Previous Post

1 जानेवारीला भीमा कोरेगावला जायचंय? पर्यायी मार्गापासून ते पार्किंगपर्यंत सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Next Post

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून 25 हजारांचे बक्षीस; संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतूक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Apghatgrastanchya-Madatisathi-Samajik-Sanstha

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून 25 हजारांचे बक्षीस; संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.