खालापूर तालुक्यातील कारगाव येथे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी तपास कार्यात पोलीस यंत्रणेला अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने केलेल्या सहकार्याची दखल घेऊन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी 25 हजार रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते, ती रक्कम खालापूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी छोटेखानी कार्यक्रमात संस्थेला प्रदान केली. यावेळी खालापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार हे देखील उपस्थित होते. ( 25 Thousand Reward From Raigad District SP To Social Organization For Helping Accident Victims Appreciation Organization Work )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या फ्रंट लाईन सदस्यांसोबत अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर आणि विजय भोसले यांनी या रक्कमेचा स्वीकार केला. कारगावचे ग्रामस्थ सुनील मुसळे आणि नरेंद्र मुसळे यांचे देखील पोलीस यंत्रणेला अतुलनीय सहकार्याबद्दल यावेळी कौतुक करण्यात आले. दैनंदिन घडामोडीत पोलीस यंत्रणेला आपला अमूल्य वेळ देणाऱ्यांचे कौतुक केल्याने समाजातील इतर घटकही अश्या वेळ प्रसंगांत पुढाकार घेतील, असा विश्वास या निमित्ताने संजय शुक्ला यांनी व्यक्त केला.
कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी फक्त पोलीस यंत्रणा पुरी पडत नाही तर त्यासाठी समाजमाध्यमं पुढे आल्याने सकारात्मक परीणाम दिसून येतात हे या घटनेने सिद्ध झाले असल्याचे सांगत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला अजूनही सक्षम करण्यासाठी मदत साहित्य आणि आधुनिक उपकरणे देणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
अधिक वाचा –
– 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जायचंय? पर्यायी मार्गापासून ते पार्किंगपर्यंत सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
– लोणावळा पोलिसांची धडक कारवाई, सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त