जुण्या मुंबई पुणे महामार्गावर शिंग्रोबा मंदिराजवळील घाटात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिमेंट बारची वाहतूक करणारा आयशर टेम्पो उलटल्याने हा अपघात झाला. यातील जखमींना तातडीने पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. ( Tempo Accident On Old Mumbai Pune Highway one Died )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
ट्रक चालक आकाश बळीराम खळगे (वय 28, रा. भोसरी, पुणे) आणि दुसरी जखमी व्यक्ती इसाक मुसा शेख (वय 28 रा. भोसरी, पुणे) हे दोन जण गंभीर जखमी झालेत. तर अमोल (पूर्ण माहिती उपलब्ध नाही) ही व्यक्ती मृत झाली आहे. सदर तीनही व्यक्ती अपघातग्रस्त वाहनामध्ये होत्या.
अधिक वाचा –
– अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून 25 हजारांचे बक्षीस; संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतूक
– 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जायचंय? पर्यायी मार्गापासून ते पार्किंगपर्यंत सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर