Dainik Maval News : सततच्या होणाऱ्या छळाला आणि बदनामीला कंटाळून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्म’हत्या केली. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ही गंभीर घटना घडली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांविरुद्ध लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश उर्फ गजानन जगदीश राऊत, शुभम उर्फ सोन्या जगदीश राऊत आणि जगदीश महादेव राऊत (सर्व रा. कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुख्य आरोपी यश उर्फ गजानन राऊत हा सदर मुलीची वारंवार बदनामी करत होता. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लक्ष ठेवणे, तिचा पाठलाग करणे आणि इतर मुलांसोबत तिचे नाव जोडून मानसिक त्रास देणे असे प्रकार सुरू होते.
गेल्या सुमारे एका वर्षापासून हा छळ सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या सततच्या मानसिक त्रासामुळे पीडित मुलगी तणावाखाली आणि उदास राहत होती.
सततच्या छळामुळे निराश झालेल्या मुलीने १० मार्च रोजी दुपारी कुसगाव येथील तिच्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला.
या प्रकरणी ८ मार्च रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आत्महत्येच्या घटनेनंतर तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड


