Dainik Maval News : मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पवन मावळ विभागातील तिकोणापेठ येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या’चार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोणापेठ, ता. मावळ, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 मे 2025 ते 10 मे 2025 दरम्यान घडली. आरोपीने पीडितेला आपल्या घरी बोलावून ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्यावर लैंगिक अत्या’चार केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 65 (1) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो कायदा) च्या कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा रजि. नं. 169/2025 दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास लोणावळा ग्रामीणचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar