व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यातील घरफोडीच्या तपासात आंतरराज्यीय गुन्हेगारांस अटक; ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ४ जण अटकेत । Lonavala Crime

लोणावळा येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 21, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Interstate criminals arrested in Lonavala house burglary investigation property worth Rs 30 lakh seized

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेसह लोणावळा पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (३२, रा. चाफेकरनगर झोपडपट्टी, चिंचवड गाव), धनंजय हरीष काळे (२०, रा. भारतनगर झोपडपट्टी), दीपक शिवाजी मेंदगे (३८, रा. पाटील आळी, कर्जत) आणि कैलासचंद्र धगनलाल जाट (४०, रा. वाशी) अशी अटक करण्यात आलेल्या आंतरराज्यीय सराईतांची नावे आहेत. यातील चंद्रकांत उर्फ चंदू माने याच्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • लोणावळा पोलीस ठाण्यात ९ जून रोजी बिना नारायण मुळे (६५, रा. राजुजी कॉलनी, जुना खंडाळा रोड, लोणावळा) यांनी त्या घरात नसताना चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. चोरांनी त्यांच्या घरातून ४७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाची चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादी मुळे या २५ मे रोजी त्यांच्या मुलीकडे आंबेगाव बु. येथे आल्या होत्या. ९ जून रोजी लोणावळ्यातील त्यांच्या शेजाऱ्यांनी चोरी झाल्याची माहिती दिली. गुन्हा दाखल होताच ग्रामीण पोलिसांनी याबाबत तपासाला सुरूवात केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत या गुन्ह्यातील आरोपी हे लोणावळा स्टेशनकडे जाऊन रेल्वेने पिंपरी-चिंचवड येथे गेल्याचे स्पष्ट झाले. गोपनीय बातमीदारांमार्फत या फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपींपैकी चंदू माने हा चाफेकर नगर झोपडपट्टी येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी चंदू माने आणि धनंजय काळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दीपक मेंदगे आणि कैलासचंद्र जाट यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांना या दोघांना ताब्यात घेत अटक केली.

आरोपी चंदू माने याच्या हा चोरी करताना नेहमी वेगवेगळे साथीदार सोबत ठेवतो. त्याच्यावर कर्नाटक, चेन्नई, सोलापूर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर हद्दीत ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. १५ ते २० दिवसांपूवीच चंदू माने हा चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (पुणे विभाग) मा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, प्रभारी लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. राजेश रामाघरे, स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत, लोणावळा शहर पो स्टेचे सपोनि राहूल लाड, ग्रेड पोसई रमेश भिसे, ग्रेड पोसई सूर्यकांत वाणी, स्था.गु.शा.चे पोलीस अमलदार, राहुल पवार, सागर नामदास, थिरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडग, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, ग्रेड पोस मुकुंद कदम, लोणावळा शहर पोस्टे पोलीस अंमलदार संदिप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांनी केली असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar


Previous Post

संतापजनक ! पवन मावळ भागातील तिकोणापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या’चार । Maval Crime

Next Post

मराठी साहित्यातील लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंत यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sahitya Akademi Award

मराठी साहित्यातील लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंत यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.