तळेगाव दाभाडे शहरातील 48 कोटी निधीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि. 3) आमदार सुनिल शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार शेळकेंनी उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधून मुलभूत सुविधांबाबत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. ‘नगरपरिषद प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने नागरिकांकडून विकास कामांबाबत अनेक मागण्या होत आहेत. जनतेच्या माझ्याकडून खुप अपेक्षा आहेत आणि त्या पुर्ण करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहील,’ असा विश्वास आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
रविवारी झालेल्या भूमिपूजन कामांमध्ये शहरातील रस्ते डांबरीकरण करणे, सभामंडप बांधणे, पथदिवे बसविणे, ओपन स्पेसला कंपाऊंड करणे, आरसीसी पाईपलाईन टाकणे इ. कामांचा समावेश आहे. दिवसभर झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार शेळकेंसह, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, उपनगराध्यक्षा श्रीमंत अंजलीराजे दाभाडे सरकार, सत्येंद्रराजे दाभाडे, किशोर भेगडे, गणेश काकडे, कृष्णा कारके, अशोक भेगडे, सुदर्शन खांडगे, दिलीप खळदे, सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, रामदास गवारे, संदिप शेळके, संतोष भेगडे, अरुण माने, नंदकुमार कोतुळकर, बाबुलाल नालबंद, बाबा मुलाणी, जगदीश कोराड, चंद्रकांत दाभाडे, संजय बाविस्कर, आशिष खांडगे, विशाल दाभाडे, विकी लोखंडे, मंगल भेगडे, वैशाली दाभाडे, शबनम खान, संध्या देसाई, तसेच माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, पत्रकार, सहकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke completed Bhumi Puja of various development works in Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून 5 कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले अजित पवारांचे आभार! 479 देवस्थानांना होणार लाभ
– अखेर ‘त्या’ 106 शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश । PCMC News
– ‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील तब्बल 47 गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम, 8 हजार 586 विद्यार्थ्यांचा सहभाग