समाजातील रंजल्या गांजलेल्यांची सेवा करत आमदार सुनिल शेळके हे खऱ्या अर्थाने संतांची शिकवण आचरणात आणत आहेत, असे गौरवोद्गार मावळ तालुक्यातील दिंडी प्रमुखांनी गुरुवारी (दि. 27 जून) काढले. मावळ तालुक्यातील पंढरपुर पायी वारी करणाऱ्या सर्व वारकऱ्यांना पोशाख देऊन कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल दिंड्यांच्या वतीने आमदार शेळके यांना धन्यवाद देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार शेळके यांच्या निवासस्थानी श्री क्षेत्र घोरावडेश्वर दिंडीचे अध्यक्ष मुकुंद राऊत, सचिव संतोष शेलार, खजिनदार गुलाब शेलार, मावळ तालका दिंडी समाजचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड, सल्लागार रोहिदास धनवे, कार्याध्यक्ष नारायणराव ठाकर, तुकाराम गाडे, सहसचिव निवृत्ती जाधव, पवन मावळ दिंडीचे विठोबा येवले, बाळासाहेब गायकवाड, उत्तमराव बोडके, किसन भोंडवे, छबुराव कडु, श्री विठ्ठल परिवारचे अध्यक्ष गणेश जांभळे, नितीन काकडे, लक्ष्मण सातकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील विविध दिंड्यांच्या वतीने आमदार शेळके यांचा फेटा बांधुन सत्कार करण्यात आला. धर्माला राजाश्रय देण्याचे काम आमदार शेळके करीत आहेत. त्यामुळे मावळ तालुक्यात धार्मिक वातावरण, संस्कार चांगले जोपासले जात आहेत. वारकरी संप्रदायासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करून देखील आमदार शेळके कधीही व्यासपीठावर जात नाहीत. यातून त्यांचा विनम्र स्वभाव व निरपेक्ष सेवाभाव दिसून येतो. आम्ही वारकरी विठ्ठलाला भेटायला आतुर असतो, त्याप्रमाणे मावळ तालुका सुनिलअण्णांना भेटायला आतुर असतो, अशा शब्दांत यावेळी मान्यवरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
वारीमध्ये सर्व दिंड्यांना भेट देण्यासाठी यावे, असे आमंत्रण दिंडी प्रमुखांच्या वतीने आमदार शेळके यांना देण्यात आले. त्याचा आमदार शेळके यांनी विनम्रपणे स्वीकार केला. वारीच्या काळात दिंड्यांना लागेल ती सर्व मदत करण्याची ग्वाही देखील आमदार शेळके यांनी यावेळी दिली. ( MLA Sunil Shelke honored by Dindi Representatives In Maval Taluka )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय ! पुणे रिंग रोड बाबत महत्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘धनलाभ’, वाचा सविस्तर
– होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन मार्फत 600 देशी झाडांची लागवड
– पालखी सोहळा काही तासांवर पण इंद्रायणी अद्याप फेसाळलेलीच, वारकरी भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त । Indrayani River Pollution