व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात ! 1 ठार, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर किलोमीटर 43.400 येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 5 जण जखमी झाले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 27, 2024
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Accident on Mumbai Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Accident on Mumbai Pune Expressway : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर किलोमीटर 43.400 येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 5 जण जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. 26 जून) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला होता. मुंबई लेनवर कल्याणकडे जात असताना खोपोली पोलिस ठाणे हद्दीत कारचा अपघात झाला. एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांची ही कार होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लहू कारभारी (रा. कल्याण जि. ठाणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, जयदेश चौधरी वय-39 (वाहन चालक), संतोष भोईर (वय-55), दिनकर बापू पाटील (वय-68) नरेश जाधव आणि अज्ञात इसम (नाव समजू शकले नाही) सर्व राहणार कल्याण (जि. ठाणे) अशी जखमींची नावे आहेत. ( Accident on Mumbai Pune Expressway of devotees returning after seeing Ekvira Devi )

प्राप्त माहितीनुसार, इर्टिगा कार (क्रमांक MH-05 EJ-8460) चालक जयदेश चौधरी सदर कारमधून वर नमूद जखमी आणि मयत यांच्यासह एकविरा येथून एक्सप्रेस वे वरून कल्याण येथे जात होते. त्यावेळी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार पहिल्या लेनच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडकून अपघात झाला. अपघातामध्ये लहू कारभारी हे जागेवरच ठार झाले. तर अन्य 5 जण गंभीर जखमी झालेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी एमजीएम रूग्णालय कामोठे येथे पाठविण्यात आले आहे. अपघातामधील मयत यास पुढील कार्यवाही करिता खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले होते. अपघाताची माहिती समजताच बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य सेवा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी मदत कार्य केले होते. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला असून अपघाताची चौकशी सुरू आहे.

अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मासिक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय ! पुणे रिंग रोड बाबत महत्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘धनलाभ’, वाचा सविस्तर
– होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन मार्फत 600 देशी झाडांची लागवड


dainik maval jahirat

Previous Post

मावळातील दिंड्यांकडून आमदार सुनिल शेळकेंचा सन्मान ; आमदार शेळके संतांच्या शिकवणीचे पालन करत असल्याचे गौरोद्गार

Next Post

लोणावळा शहर बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर कायमचा उपाय ! एकेरी वाहतुकीचा पर्याय फायनल । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Helmet-Day

लोणावळा शहर बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर कायमचा उपाय ! एकेरी वाहतुकीचा पर्याय फायनल । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.