आमदार सुनिल शेळके यांनी गुरुवारी (दिनांक 27 एप्रिल) मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बौद्धकालीन भाजे लेणी परिसरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. मावळ तालुक्याचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या भाजे लेणी परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. ( MLA Sunil Shelke inspected ongoing development works at Bhaja Buddhist Caves Leni area )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भाजे लेणी भागात पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, पर्यटकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फुटपाथ बांधणे, सुलभ शौचालय बांधणे, पार्किंग व्यवस्था करणे अशी विविध कामे सुरु आहेत. ही कामे दर्जेदार झाली पाहिजेत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनीही लक्ष ठेवावे, अशा सुचना यावेळी आमदार शेळके यांनी दिल्या. तसेच सुरु असलेल्या कामांत आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
अधिक वाचा –
– आठवडे बाजारात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर वडगाव नगरपंचायत प्रशासनाची धडक कारवाई
– मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 98.27 टक्के मतदान; 1,590 मतदारांनी बजावला हक्क, शनिवारी मतमोजणी