पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतचा अंतिम अहवाल 15 दिवसात जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, तसेच जमीन वापरासंदर्भातील सर्व तांत्रिक त्रुटी अडचणी दूर करुन अंतिम अहवाल सादर करण्याच्या सुचना आमदार सुनिल शेळके यांनी मावळ महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. ( MLA Sunil Shelke Notice To Maval Tehsil Administration For Pavana Dam Affected Peoples Issues )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सोमवार (7 नोव्हेंबर) रोजी पवना धरणग्रस्त संयुक्त समितीच्यावतीने मावळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार सुनिल शेळके यांच्यावतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना देण्यात आले. यावेळी मुकुंद काऊर, रविकांत रसाळ, लक्ष्मण भालेराव, बाळासाहेब काळे, मारुती दळवी, दशरथ शिर्के, राम कालेकर, बाळासाहेब मोहोळ, नारायण बोडके, दत्तात्रेय ठाकर, किसन घरदाळे, तुकाराम पाठारे, दत्तात्रेय घरदाळे, शांताराम पाठारे, अनंता वर्वे, अनंता लायगुडे, रोहिदास कडू, सीताबाई डोंगरे आदी उपस्थित होते
धरणग्रस्त संयुक्त समितीच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या
1) धरणगस्तांनी जमीन वाटपासंदर्भातील नाव नोंदणी संदर्भातील 563 हरकतींबाबत योग्य ती तपासणी करून निर्णय घ्यावा
2) यापूर्वी पुनर्वसन झालेल्या खातेदारांची अद्ययावत गाववार यादी देण्यात यावी..
3) सन 1995 ते 98 दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जमिनी पुनर्अनुदानित केलेल्या खातेदारांची गावनिहाय यादी देण्यात यावी.
4) पवना धरणग्रस्तांच्या वारसांना पिंपरी चिंचवड महापालिका व औद्योगिक कारखान्यामध्ये नोकऱ्या देण्यात याव्यात.
अधिक वाचा –
– भयंकर! रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृत्यू, रेल्वे अंगावरुन गेल्याने शरीराच्या अक्षरशः ठिकऱ्या
– महाविद्यालयीन तरुणाची टोळक्याकडून हत्या, तळेगाव दाभाडेतील खळबळजनक घटना