गणेशोत्सवाच्या निमित्ताने सध्या सगळीकडेच नेतेमंडळी गावभेट दौरे करताना दिसत आहे. गणशे मंडळांच्या भेटीगाठी घेऊन स्थानिकांशी संवाद साधत जनसंपर्क अधिक वाढवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे. मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) हे देखील विविध गणेशमंडळांना भेटी देत स्थानिकांशी संवाद साधत आहे.
सोमवारी (5 सप्टेंबर) गणेशोत्सवाच्या ( Ganesh Festival 2022 ) निमित्ताने पवन मावळ मधील परंदवडी, धामणे, उर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बौर-बौरवाडी या गावांतील गणेश मंडळांना आमदार शेळकेंनी सदिच्छा भेटी देत ‘श्री गणपती’ बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
बौर-बौरवाडी व इतर काही गावांमध्ये सामूहिक आरती व विसर्जन केले जाते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही जोपासली जाते, हे कौतुकास्पद आहे. समाजामध्ये एकजुटीची भावना जागृत व्हावी म्हणून सुरू झालेला सण म्हणजे गणेशोत्सव. प्रत्येक गावामध्ये हीच एकोप्याची भावना दृढ व्हावी, अशी प्रार्थना आमदार शेळकेंनी गणपती बाप्पा चरणी केली. यावेळी आमदार शेळकेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच सर्व पदाधिकारी, सरपंच, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke Visit Ganesh Mandals in Pavan Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
खासदार बारणेंची मतदारसंघातील सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेट
पुढच्या वर्षी लवकर या! मावळ तालुक्यात घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन