गेल्या 40 दिवसांपासून L&T कंपनीमध्ये काम करणारे स्थानिक भूमिपुत्र आपल्या हक्कासाठी पुणे कामगार आयुक्तालय या ठिकाणी आंदोलन करत आहेत. कामगार आयुक्तालय आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या मध्यस्थीने बैठकीतून मार्ग निघेल, अशी अपेक्षा होती. परंतू L&T कंपनीचा मुजोरीपणा पाहता स्थानिक भूमिपुत्रांना वाऱ्यावर सोडून कंपनी चालवून दाखवू, अशी आडमुठेपणाची भूमिका कंपनी व्यवस्थापन घेत आहे. ( MLA Sunil Shelke Warns Of Agitation For L&T Company Workers )
“कंपन्या स्वतःच्या हितासाठी, नफेखोरीसाठी जर अशा पद्धतीने काम करणार असतील. तर अशा ( L&T, जनरल मोटर्स) कंपन्यांच्या विरोधात लढा उभा करण्याची आता वेळ आली आहे. भविष्यात कुठल्याही कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरुन मुजोरीपणा करण्याची हिंमत दाखवू नये, यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी आवाहन केले आहे.
“जर येत्या 1 डिसेंबर 2022 पर्यंत L&T कंपनीच्या व्यवस्थापकांनी आपल्या कामगार बांधवांना योग्य न्याय दिला नाही, तर 2 डिसेंबर 2022 रोजी सर्व पक्ष, संघटना व स्थानिक भूमिपुत्रांच्या उपस्थितीत “तळेगाव MIDC बंद” करुन निषेध करण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस कंपनी व्यवस्थापन सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. आपली एकजूट व ताकद स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी उभी करुयात,” असेही आमगार सुनिल शंकरराव शेळके यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा –
– मावळच्या तळपेवाडीचा ‘सागर’ बनला ‘एसटीआय’, MPSC परीक्षेत घवघवीत यश, गावाने काढली जंगी मिरवणूक
– वडगाव शहरात पीएमपी बसचे सवलतीचे पास सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी